शरद पवारांवर प्रचंड ‘निष्ठा’ आणि ‘विश्वास’, शिवसेनेच्या ‘या’ दिग्गजानं सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर आपली प्रचंड निष्ठा आणि विश्वास असल्याची भावना व्यक्त केली. पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे, महाविकासआघाडीचे सरकार आणि इतर विषयांवर आपल्या सडेतोड शैलीत भूमिका मांडली. संजय राऊत यावेळी म्हणाले की शरद पवारांनी पाहिल्या दिवसापासून आम्हाला सांगितले की, आपण हे करु शकतो, काही नवीन घडवू शकतो.

हे सरकार बनवयाचे, टिकवायचे तसेच चालवायचे असे शरद पवार यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही हे सरकार पाच वर्ष चालवणारच. शरद पवार हे ठाकरे सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे शरद पवारांवर माझी प्रचंड निष्ठा आणि विश्वास आहे. यावेळी संजय राऊत यांनी उदयनराजे यांना देखील अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले की शरद पवारांना मी मानतो कारण त्यांनी अनेक वर्ष लोकांसाठी काम केले आहे. शरद पवार हे जाणते राजे आहेत आणि राहणार, लोकांनी त्यांना ही पदवी दिली आहे. शरद पवारांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. रिमोट कन्ट्रोलद्वारे ते राज्य चालवत नाहीत. सरकारमध्ये जे चांगलं आहे ते सांगतात आणि चुकीचं आहे त्याला विरोध करतात. अशा शब्दात संजय राऊतांनी शरद पवारांच्या कार्यपद्धतीचे देखील कौतूक केले.

लोकशाही बळकट करायची असेल तर विरोधी पक्ष सक्षम हवा
देशाची लोकशाही बळकट करायची असल्यास विरोधी पक्ष सक्षम राहिला पाहिजे. यासाठी सत्ताधारी पक्षाने विरोधकांना बळ देण्याची आवश्यकता आहे. राज्यात 105 आमदारांचा विरोधी पक्ष आहे अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/