‘आमचा पक्ष लाचार नाही, कधी कोणाचे तळवे चाटले नाहीत’ : नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमच्या पक्षानं कधी कोणाचे तळवे चाटले नाहीत. मला भाजपमध्ये असल्याचा अभिमान आहे असं वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत आहे. राज्यात नवीन सरकार येणार आहे यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, “मला भाजपसोबत असल्याचा अभिमान आहे. आमच्या पक्षानं कधी लाचारी केली नाही. आमच्या पक्षानं कधी कोणाचे तळवे चाटले नाहीत. मातोश्रीवर बसून आदेश देणं सोपं आहे परंतु आता त्यांना उत्तर द्यावी लागणार आहेत” असे म्हणत नितेश राणेंनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येणार हे आता निश्चित झालं आहे. उद्या (गुरुवार दि 28 नोव्हेंबर) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियचेची शपथ घेतील हे फायनल झालं आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आता सत्तेत येणार आहे. नवीन येणाऱ्या सरकारबाबत नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, “आता नवीन येणाऱ्या सरकारला कामे करावी लागतील. उत्तरं द्यावी लागतील. घोडा आणि मैदान जवळच आहे. त्यांना आता शिवस्मारक बांधावं लागेल. शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा करावा लागेल.” असा टोलाही राणेंनी लगावला.

Visit : Policenama.com