आमचा पंतप्रधान काळ्या रंगाला घाबरतो

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – आमचा पंतप्रधान काळ्या रंगाला घाबरतो असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. नांदेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काळा रंग घालून आलेल्या माणसांना बाहेर काढण्यात आलं. हा मुद्दा सांगत राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मोदींच्या सभेला काळा रंगाचा शर्ट घालून आला म्हणून त्याला परत पाठवत सभेतून बाहेर काढण्यात आले. एकाने काळं बनियन घातलं म्हणून त्याला बाहेर काढण्यात आलं. ” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. काळे कपडे घालणाऱ्यांना अशी वागणूक दिली जाते. आमचा पंतप्रधान काळ्या रंगाला घाबरतो असेही राज ठाकरे म्हणाले.

You might also like