पंतप्रधान सुज्ञ असावा अशी इच्छा होती ; राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचाराची तोफ डागल्यानंतर काही काळ थंड झालेली तोफ राज ठाकरेंनी पुन्हा डागली आहे. पंतप्रधान मोदी निवडणूकीच्या प्रचारात विकासावर बोलायचं सोडून देशभक्ती, राजी गांधी या भलत्याच विषयावर बोलत आहेत. देशाचा पंतप्रधान सुज्ञही असायला हवा असा टोला राज ठाकरे यांनी आज डागली.

मनसे नेत्यांची आज ठाण्यात झालेल्या बैठकित ते बोलत होते. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन यावेळी पंतप्रधान मोदींची त्यानी मोदींवर तोफ डागली.

राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या विमानांच्या रडार आणि ढगाळ वातावरणाबाबतच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले , यावेळी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चाललेली नाही. तर ती देशभक्त विरुध्द गाली भक्त या मुद्द्यांवर रंगविली जात आहे. या प्रश्नावर त्यांनी हे ठरवायचं नाही. देशभक्तीची तिकीटं तुम्ही नाही वाटायची. नवाज शरीफला जाऊन केक भरवायचा होता. तेव्हा देशभक्ती आणि देशद्रोही ठरवायला हवं होतं. असा टोलाही त्यांनी लगावला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like