नागरिकांचे मन ‘जिंकणे’ हेच आमचे ‘यश’, कोंढव्यात विविध विकास कामाचे भूमीपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकांना होत असलेल्या अडीअडचणी सोडविणे हे आमचे कामच आहे. त्याचबरोबर आपल्या मदतीने धावून येतील, असा नागरिकांना विश्वास असणे आणि त्यांची मन जिंकणे हेच आमचे यश आहे, असे विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका परविन हाजी फिरोज यांनी व्यक्त केला.

कोंढव्यातील भाग्योदयनगर येथील गल्ली क्रमांक ३१ मधील ड्रेनेज पाईप टाकण्याचे आणि रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

गेल्या अनेक महिन्यांपासून भाग्योदयनगर गल्ली क्रमांक ३१ मधील नागरिकांना ड्रेनेज तुंबण्याच्या समस्येमुळे त्रास सहन करावा लागत होता. ही लोकांची अडचण लक्षात घेऊन ऑल कोंढवा सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज शेख व माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या पुढाकाराने नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि हमिदा सुंडके यांच्या विकास निधीतून १ कोटी रुपयांचा निधी भाग्योदयनगर गल्ली क्रमांक ३१ या परिसरात नवीन १८ इंचीचे ड्रेनेज लाईन टाकण्याचे व रस्ता क्राँकिटीकरण कामासाठी मंजुर करण्यात आले होते. या कामाचा भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

भाग्योदरनगर गल्ली क्रमांक ७ आणि २७ मध्ये टप्पे रेलिंग आणि कॉक्रिट रस्त्याच्या कामासाठी ४० लाख रुपये, भाग्योदरनगर गल्ली क्रमांक १५ आणि १६ च्या क्रॉकिटीकरणासाठी ३० लाख रुपये, मक्का मशीद ते नवाजीश पार्क चौक दरम्यान १८ इंची ड्रेनेज लाईन आणि डांबरी रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये, सर्व्हे नंबर ४२ जे के पार्क चौक ते नूर चोक येथे १८ इंची पाईप लाईनसाठी २० लाख रुपये अशा कामांना मंजुरी देण्यात आली आहे. हे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

याबरोबरच साईबाबा नगर येथील गल्ली क्रमांक ७ मधील ड्रेनेज लाईन, रस्ता डांबरीकरण, अशोका मिव्ज समोरील रस्ता क्रॉक्रिटीकरण तसेच मौलाना अब्दुल कलाम उर्दू शाळा येथे मुलांना बसण्यासाठी बेंचेस, मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, विशेषतः हज हाऊस व इतर कामे प्रभागात करण्यात येणार आहे.

त्याच प्रमाणे मनपाच्या कै. मीनाताई ठाकरे दवाखान्यात सोनोग्राफी रुम तयार करणे, दवाखान्यात २४ तास विद्युत पुरवठा रहावा, यासाठी जनरेटर सेट बसविणे अशी नागरिकांच्या सोयीसाठी कामे करण्यात येत आहे.आपल्या परिसरात विकासाची कामे विशेषत: रस्ते आणि ड्रेनेज लाईनचे प्रश्न मार्गी लागल्याचे पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेले नागरिक विशेषत: महिलांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी मलंग चाचा, मुनिर भाई, हाफिज शोएब, मौलाना, एजाज भाई, जुबेर भाई, मजहर भाई, मजहर मणियार, एजाज भाई, इब्राहिम खान, कादर भाई, वसीम भाई, अमजद पठाण, शहानवाज शेख यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या.

Visit : Policenama.com