राष्ट्रवादीतील आऊट गोईंग हे ‘परिवर्तन’च : खा. अमोल कोल्हे (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून अनेकजण भाजपामध्ये आपले स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीमधून सुरु असलेले आऊट गोईंग हे परिवर्तन असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच महाजनादेश यात्रा आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्रीपदासाठी सुरु केल्या असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सहा ऑगस्टपासून निघणार आहे. ही यात्रा महाराजांच्या साध्या मावळ्यांची असणार आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच्या यात्रेशी याची तुलना करू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पासून महाजनादेश यात्रा सुरु झाली आहे.

पक्षातील आऊट गोईंगला आपण परिवर्तन असे म्हणतो. या घटनांमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलले दिसेल. भाजपा-शिवसेनेची यात्रा मुख्यमंत्री पदासाठी आहे. मात्र, शिवस्वराज्य यात्रा महाराजांचा सर्वसामान्य मावळा काढतो आहे, जो या स्पर्धेत कुठेही नाही. मला खुर्ची हवी म्हणून मी यात्रा काढत नाही, रयतेचे राज्य यावे यासाठी ही यात्रा काढत असल्याचे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like