बाबो ! ४८ पैकी २७ खासदारांवर फौजदारी गुन्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाची लोकसभा निवडणूक मोठ्या धडाक्यात पार पडली. राज्यात काही लोकसभा मतदार संघाचे धक्कादायक निकाल लागले. या निवडणुकीत भाजप – शिवसेना महायुतीने बाजी मारली. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीबाबत धक्कादायक बाब अशी की, या निवडणुकीत ४८ खासदारांपैकी २७ खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ४८ खासदारांपैकी भाजपचे २३, शिवसेनेचे १८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, काँग्रेस १ व अपक्ष १ असे खासदार विजय होऊन संसदेत पोहोचले आहेत. राज्यातील या ४८ खासदारांमध्ये २७ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले असून १४ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

ही माहिती विजयी उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली असून महाराष्ट्र इलेक्शन वार्ड आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक या संस्थांनी या शपथपत्र यांचे विश्लेषण केले आहे. खासदारांची आर्थीक पार्श्वभूमी विचारात घेता सर्व ४८ उमेदवार गडगंज असल्याची माहितीही यातून समोर आली आहे. यात सर्वाधिक मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त खासदार उदयनराजे यांचीआहे. शैक्षणिक गुणवत्तेत १ खासदार केवळ पाचवी शिकलेले तर एक खासदार पीएचडी असल्याचे दिसून आले आहे.

गुन्हगारी पार्श्वभूमी असणाऱ्या खासदारांची पक्षनिहाय आकडेवारी

१) भाजप -१३

२)शिवसेना -११

३)राष्ट्रवादी ,काँग्रेस आणि एमआयएम -प्रत्येकी १

गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या खासदारांची पक्षनिहाय आकडेवारी

१)भाजप -६

२)शिवसेना -५

३)राष्ट्रवादी ,काँग्रेस आणि एमआयएम -प्रत्येकी १