उपचारांसाठी देश सोडला, ‘परागंदा’ मेहुल चोक्सीचा ‘कांगावा’ !

मुंबई : वृत्तसंस्था – तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात ‘परागंदा ‘ झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी याचा साथीदार मेहुल चोक्सीने आता नवा कांगावा केला आहे. मी पळून नाही तर वैद्यकीय उपचारांसाठी देशातून बाहेर गेलो. मात्र आता मी आजारपणामुळे प्रवास करू शकत नाही, यासाठी आजाराचे पुरावेही त्याने उच्च न्यायालयाला सादर केले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात ‘परागंदा’ झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी याचा साथीदार मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये वास्तव्यास आहे. त्याने आता वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडल्याचे म्हटले असून तसे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

मी पीएनबी घोटाळ्यामुळे भारत देश सोडला नाही, असे त्याने ठामपणे नमूद केले आहे. तसेच तपास यंत्रणांना सहकार्य करीत असून जर न्यायालयाने संमती दिल्यास तपास अधिकारी अँटिग्वाला चौकशीसाठी येऊ शकतात, असे नमूद करून खटल्याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. मात्र बरे वाटले तर भारतात येईन असेही चोक्सीने म्हटले आहे. पण ईडी आणि सीबीआयने आपल्याला ज्या खटल्यांमध्ये आरोपी बनविले आहे ते चुकीचे आहे. याकडे लक्ष वेधून विशेष न्यायालयासमोर आणि तपास अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे येण्याची तयारीही चोक्सीने दर्शविली आहे.

सिने जगत –

गर्दीत अडकलेल्या ‘फिटनेट क्‍वीन’ दिशा पाटनीची पुन्हा ‘त्याने’ केली सुटका, पहा दिशाचे ‘ते’ सर्व फोटो

‘या’ अभिनेत्याला करायचाय ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीसोबत ‘इंटिमेट’ सीन

 

आरोग्यविषयक वृत्त

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

पीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी गाईचे दूध चांगले की म्हशीचे ?

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

शरीराचे ‘तो’ भाग दाबल्याने दूर होतात अनेक समस्या