यामुळे अनेक महिलांना घ्यावा लागला गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक गावात आपण पाहिले असेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषित बालके, तारुण्यात वैधव्य आलेल्या मुली यांच्या वाटेला नेहमी कष्ट आणि दुःख असते. त्यांना जागोजागी कामासाठी भटकंती शिवाय पर्याय नसतो. यावेळी कामाकडे लक्ष देणार की आरोग्याकडे ? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. अशाच ग्रामीण भागात कामामुळे व त्याचबरोबर दुष्काळासमोर हतबल झालेल्या अनेकींना स्वतःचे गर्भाशय काढण्याची वेळ येते. यावेळी पैसे नसल्यामुळे किंवा परिस्थितीमुळे काढून टाकणे योग्य असे मानून ते इतका मोठा निर्णय घेतात. अशा महिला केवळ ऊस तोडणीचे काम करुन याचा परिणाम त्यांच्या गर्भाशयावर झालेला आहे. त्यामुळे त्यांनी गर्भाशय काढून टाकले आहे. याचे संपूर्ण वास्तव्य आपण जाणून घेऊया….

एका रिपोर्टनूसार वंजारीवाडी येथील निम्म्यापेक्षा जास्त कमी वयातच महिलांनी गर्भाशय काढून टाकले आहे. दरवर्षी दुष्काळग्रस्त भागातून लाखो स्त्री आणि पुरुष स्थलांतर करत असतात. ऑक्टोबर ते मार्च महिन्यात यांना कामासाठी वणवण हिंडावे लागते. ऑक्टोबर ते मार्च महिन्यात याचे प्रमाण जास्त असते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाण असते. यावेळी मुकादम व्यवहार करताना प्रत्येक जोडप्याला व्यवहार ठरवून देत असतो. आणि त्यांना ऊस तोडणीसाठी घेतले जाते. यामध्ये गर्भाशय काढणाऱ्या महिलांना जास्त प्रमाणात असतात. याकामात त्यांना मोबदला ही कमी दिला जातो. काम जास्त आणि मोबदला कमी असे काही. यामध्ये त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.

या कामासाठी त्यांना प्रत्येकी २५० रुपये मिळतात. एका हंगामात ४ ते ५ महिन्यात जोडप्यांकडून ३०० ऊस तोडला जातो. हे सर्व काम ४ ते ५ महिन्यात संपवावे लागते. यामध्ये त्यांना खुप त्रास देखील होतो. उदा. साधी पोटदुखी, अंगावरुन पांढरे जाणे अशा समस्येवर डॉक्टर महिलांना गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देतात. महिलांना शरीरातून गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये किंवा फॅब्रॉईड सारख्या आजाराला सामोरे जाण्यापेक्षा गर्भाशय काढून टाकण्यात ते योग्य समजतात. यानंतर त्यांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.