बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचं थैमान ! अभिनेत्री आलिया भट्टला Corona ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची दुसरी लाट देशभर पसरत असून याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी याना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टचा कोरोना चाचणी अहवाल बाधित आला आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, मनोज बाजपेयी, आर. के. माधवन, परेश रावल, आमिर खान आदींचा समावेश आहे.
आलिया कोरोनाबाधित झाल्याची माहिती फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन देण्यात आली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी सायंकाळी त्यांच्या डबिंग सेशननंतर एकत्र दिसले आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात पहिल्यांदाच दोघंही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आलिया भट्ट व्यस्त होती. मात्र आलियाला कोरोनाची लागण झाल्याचे समजत असल्याचे या चित्रपटाच्या चित्रीकरणावर परिणाम होऊ शकतो.

यापूर्वी मिलिंद सोमण, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया, रमेश तौरानी, बप्पी लाहिरी आणि सतीश कौशिक अशा विविध कलाकारांचाही कोरोनाचाचणी बाधित आली आहे. ‘बाहुबली’ फेम एस. एस. राजामौली दिग्दर्शन करत असलेल्या ‘आरआरआर’ चित्रपटामुळे आलिया भट्ट चर्चेत आली होती. या चित्रपटात आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आलियासोबतच ज्युनियर एनटीआर, अजय देवगन आणि राम चरणसुद्धा दिसणार आहेत.