कोल्हापूरातील धक्कादायक प्रकार ! अतिक्रमण केल्याच्या रागातून चक्क पोलिस निरीक्षकाचं घर पेटवलं

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमध्ये अतिक्रमणाच्या रागातून पोलीस निरीक्षकांचेच घर पेटवून दिल्याचा प्रकार घडला. भदरगड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. कोल्हापूरमधील पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे घर आरोपी सुभाष देसाईकडून रॉकेल टाकून जाळण्यात आले.

पोलीस लाईनमध्ये अतिक्रमण केल्याने रागाच्या भरात या आरोपीने पोलीस निरीक्षक पतंगे यांचे घर आणि वाहन रात्री 1 च्या सुमार पेटवले. यात पोलीस निरीक्षकाची चार चाकी गाडी जळून खाक झाली. यात पोलीस निरीक्षकांच्या घराचा काही भाग पेटला आहे.

पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सुभाष देसाई याच्यावर कारवाई करत त्याचे अतिक्रमण काढले. त्यानंतर रात्री दीडच्या समुरास या आरोपींने पोलीस निरीक्षक पतंगे यांच्या गाडीवर रॉकेल ओतून गाडी पेटवून दिली आणि त्यानंतर घरावर रॉकेल टाकून घर जाळण्यात आले. त्यानंतर पतंगे घरातून बाहेर आले आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन सुभाष देसाई पळून गेला. परंतु तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती आणि घराचा काही भाग पेटला होता. यानंतर पोलीस पथके तातडीने रवाना झाली होती आणि आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे.