Lockdown 3.0 : पुणेकरांना मोठा दिलासा ! प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील दुकाने ‘या’ 12 तासा दरम्यान उघडी राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेने कोरोना व्हायरसमुळं उध्दभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता पुणे मनपा क्षेत्रासाठी आज पुन्हा सुधारित आदेश काढले आहेत. त्यामध्ये पुणे शहराचे दोन भाग करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अशी त्यांची विभागणी करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने ही सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान उघडी राहणार असल्याचा आदेश मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज (बुधवारी) दुपारी काढला आहे. हे आदेश दि. 17 मे पर्यंत लागू असणार आहेत.

1. प्रतिबंधित क्षेत्र (69 परिसर) जी मनपा आयुक्तांनी निश्चित केली आहेत त्यामध्ये केवळ आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरू राहणार आहे. कोणत्याही बिगर अत्यावश्यक सेवा / वस्तूंचा पुरवठा करणारे व्यवसाय सुरू राहणार नाहीत. आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरिता असलेली दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. बिगर अत्यावश्यक सेवा/ वस्तूंची दुकाने बंद राणार आहेत.

2. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील उर्वरित मनपा क्षेत्रामध्ये एकल (स्वतंत्र) दुकान, रहिवाशी कॉलनीतील दुकाने, रहिवाशी संकुलातील दुकाने आणि गल्ली / रस्त्यालगतची दुकाने ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजपर्यंत उघडी राहणार आहेत. त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.

बिगर अत्यावश्यक सेवा / वस्तूंचा पुरवठा करणारे कोणते व्यवसाय सुरू राहतील या बाबतचा स्वतंत्र आदेश करण्यात आलेले आहेत.