भोईटे गुरुजी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील ग्रंथालय चळवळ, धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे गुरुजी यांना विभागीय स्तरावरील डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक वाचनालये सुरू केली आहेत. या ग्रंथालयाकडून जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सेवानिवृत्त असणारे ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी कोथळे येथे वाचन संस्कृती रुजावी यासाठी १९६४ साली जनसेवा वाचनालय आणि ज्ञानरंजन वाचनालय ग्रंथालयाची प्रशस्त इमारत उभी केली असून सहा हजार विविध पुस्तके ग्रंथालयात आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like