मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंचगंगा नदीत जल आंदोलन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

प्रतिनिधी: शिल्पा माजगावकर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक मराठा बांधवानी जलसमाधी घेतली. मात्र अजूनही शासनाला जाग येत नाही त्याच्या निषेधार्थ तालुक्यातील कुरुंदवाड-भैरववाडी येथील पुलानजीक असलेल्या पंचगंगा नदी पात्रात सुमारे 20 आंदोलकांनी जल आंदोलन केले. यावेळी शासनाने आरक्षण न दिल्यास येत्या १५ ऑगष्ट रोजी शासकीय व्यक्तीस झेंडा वंदन कुरु देणार नसल्याचा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 15 दिवसापासून शिरोळ आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गुरुवार ९ ऑगष्ट रोजी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तर शुक्रवार दिं १० रोजी तालुक्यातील कुरुंदवाड- भैरववाडी पुलानजीक असलेल्या पंचगंगा नदीत जल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर भैरववाडी येथील मराठी शाळे समोरील नदी पात्रजवळ सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळी साडेदहाच्या सुमारास ग्रामदैवत भैरोबाचे  दर्शन घेऊन  तब्बल दोन तासाहून अधिक काळ नदीपात्रात उतरून छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी’जय शिवाजी, एक मराठा’लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत जल आंदोलन केले. या जल आंदोलनात राजू बेले,सचिन मोहिते, महेश दळवी,जिन्नाप्पा पोवार,अवधूत बिरंजे, जयवंत मोहिते,अवधूत भोसले,चंद्रकांत  पोवार, ऋषी बिरंजे,अक्षय रोडे,ओंकार पवार,गिरीश भोसले,गुरु खटावे,रवी मुडशिंगीकर,आदित्य बेले,  अवधूत बाळू भोसले,ओंकार बेले यांनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. 20 हुन अधिक कार्यकर्त्यांनी जलआंदोलन केले. यावेळी आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धार कमी करण्यात येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण दिलेच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात अाली. यावेळी शिरोळचे नायब तहसीलदार जे वाय दिवे यांनी वजिर रेस्क्यू फोर्सचा बंदोबस्त लावला होता तर सपोनि कुमार कदम पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी या जलआंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
[amazon_link asins=’B00Y6EHHQ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc8c1a8e-9ca7-11e8-8c23-a3120598276d’]

यावेळी मंडल अधिकारी चंद्रकांत काळगे,गाव कामगार तलाठी सुनील बाजारी,कोतवाल मनोहर कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, नगरसेवक उदय डांगे,सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील,वजीर रेस्क्यू फोर्सचे रऊफ पटेल,  शरीफ चौगुले सह अदि उपस्थित होते.तासभर प्रतिकात्मक जल आंदोलन घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
[amazon_link asins=’B07D9G4PMX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ccf6d572-9ca7-11e8-8470-c31d8ce4a4ab’]