धक्‍कादायक ! वर्षभरात १ हजार पेक्षा जास्त रूग्णांना चढवण्यात आले HIV संक्रमित रक्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे एचआयव्हीला बाधा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना एक देशात एक मोठी घटना घडली आहे. सरकार विविध पद्धतींनी जनजागृती निर्माण करत असताना जर डॉक्टर किंवा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे कोणी व्यक्ती एचआयव्ही बाधित होत असेल तर. देशात रुग्णांना संक्रमित रक्त चढवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती आधिकारात पुढे आला आहे.

देशातील १ हजार ३४२ जणांना चढवण्यात आले संक्रमित रक्त
एका माहिती अधिकारात हा खुलासा झाला आहे. माहिती अधिकारात मागवण्यात आलेल्या माहितीत ही बाब समोर आली की, देशभरातून जवळपास १ हजार ३४२ जणांना संक्रमित रक्त चढवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात संक्रमित रक्त चढवण्याचे प्रकार जास्त
रुग्णांना संक्रमित रक्त चढवण्यात उत्तर प्रदेश सर्वात पुढे आहे. उत्तर प्रदेशात अशी २४१ प्रकरणे समोर आली आहेत. पश्चिम बंगालमधून देखील १७६ प्रकरणे पुढे आली आहेत. तर दिल्लीतून १७२ लोकांना असे संक्रमित रक्त चढवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका अधिकाऱ्यांने सांगितले की रक्तातून पसरणारे एचआयव्हीची प्रकरणे उघड करणे तसे थोडे अवघडच आहे. जेव्हा कोणी व्यक्ती एचआयव्ही पॉजिटीव असले तेव्हाच कौन्सिल त्याला प्रश्व विचारते अशा वेळी तो व्यक्ती ‘ब्लड ट्रांफ्युजन’ची निवड करतात.

महाराष्ट्रात वर्षाला एचआयव्हीचे २१ हजार रुग्ण
मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता, जवळपास ८५ हजार ते १ लाख लोक वर्षाला एचआयव्हीने बाधित होतात. जर महाराष्ट्रचा विचार केला गेला तर येथे तब्बल २१ हजार लोक दरवर्षी एचआयव्हीने बाधित होता.

आरोग्यविषयक वृत्त

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

You might also like