Flashback 2019 : वर्षभरात भारताच्या 21 हजारहून जास्त वेबसाईट झाल्या ‘हॅक’, निशाण्यावर राहिलं ‘ई-कॉमर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॅकिंग ही सध्या जगातील सर्वात मोठी समस्या आहे, सायबर अटॅक मुळे अमेरिका सारख्या देशाची हालत खराब आहे त्यातच भारतामध्ये देखील सायबर अटॅक दिवसेंदिवस वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, यावर्षी ऑक्टोबर 2019 पर्यंत भारतातील 21,467 वेबसाइट हॅक करण्यात आलेल्या आहेत.

भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद कार्यसंघ
2015 मध्ये 49 हजार 455, 2016 मध्ये 50 हजार 362, 2017 मध्ये 53 हजार 117, 2018 मध्ये 2 लाख 08 हजार 456 आणि 2019 मध्ये 3 लाख 13 हजार 649 सायबर घटना घडल्या असल्याचे भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीमच्या (सर्टीइन) दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून मंत्री धोत्रे यांनी माहिती दिली.

या देशातील हॅकर्सने केला हल्ला
अल्जेरिया, ब्राझील, चीन, फ्रान्स, नेदरलँड्स, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, सर्बिया, दक्षिण कोरिया, तैबान, थायलंड, ट्युनिशिया, अमेरिका आणि व्हिएतनाम अशा देशांमधील हॅकर्सनी भारतात सायबर हल्ले केल्याचा दावा धोत्रे यांनी केला. आयपी ऍड्रेस लपवून ठेऊन हे हल्ले करण्यात आल्याची माहिती धोत्रे यांनी दिली असे केल्याने हॅकरचा मागोवा घेण्यास अडचण निर्माण होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like