Corona Virus : ‘कोरोना’चा हाहाकार सुरूच ! जगभरात 2800 जणांचा बळी तर 83000 लोकांना ‘लागण’

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमधून सुरु झालेला कोरोना व्हायरस ने जगभरात थैमान घातले आहे. जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. आतापर्यंत जवळजवळ २८०० लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ८३००० हजार लोकांना त्याची लागण झाली आहे. प्रत्येक देशाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये ७८ हजार ८२४ पैकी २ हजार ७८८ लोकांचा प्राण गेला आहे. सर्वाधिक मृतांची संख्या हुवेई भागात आहे. हॉंगकॉंगमध्ये ९२ रुग्णांपैकी २ जणांचा बळी गेला आहे.

दक्षिण कोरियात दोन हजार लोकांना संसर्ग
शुक्रवारी दक्षिण कोरियात या व्हायरस ची बाधा झालेले २५६ जण नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग झालेल्या लोकांची दक्षिण कोरियातील संख्या २,०२२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण हे दाएगू मधील आहेत. दक्षिण कोरियात या विषाणूचे संसर्ग झालेल्या पैकी निम्मे लोक हे शिनचेंगजी चर्च ऑफ जीसस शी संबंधित आहेत. हे चर्च या रोगाचे केंद्रस्थान मानले जात आहे.

चीनमध्ये नवे ३२७ रुग्ण
चीनमध्येच उगम पावलेल्या या रोगामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला असून,नवीन ३२७ रुग्ण आढळून आले आहेत. चीनमध्ये एकूण ७८ हजार ८२४ लोकांना संसर्ग झालेला आहे आणि सर्वाधिक प्रभाव हा हुबेई प्रांतात आहे.

जगाच्या पाठीवरील रुग्णांची संख्या
जपानमध्ये क्रूझ जहाजावरील ७०५ सह ९१८ नागरिकांना या रोगाची लागण झाली आहे. ८ जणांनी आपला जीव गमावला आहे. इटलीत सुद्धा ६५० लोक बधित असून ८ जण मृत्युमुखी पडले आहेत. इराणमध्ये २४ जणांचा बळी गेला असून, २५४ जणांना लागण झाली आहे. तसेच सिंगापूर मध्ये ९६, अमेरिकेत ६०, कुवैत मध्ये ४३, थायलंड मध्ये ४९, व बहरीन मध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. तैवानमध्ये ३२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.