Coronavirus : ‘टेस्ट ट्रॅक ट्रीट’ रणनीती अंतर्गत आतापर्यंत 3.5 कोटी लोकांची झाली ‘कोरोना’ टेस्ट : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या 31 लाखांच्या पुढे गेली आहे. यासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) मंगळवारी सांगितले की, ‘टेस्ट ट्रॅक ट्रीट’ च्या रणनीतीचा अवलंब करून आतापर्यंत कोरोना व्हायरस (कोविड – 19) साठी 3.5 कोटीहून अधिक लोकांची चाचणी घेण्यात आली आहे.’ मंत्रालयाने ट्विट करून याबाबत माहिती दिली.

मंगळवारी, देशात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची एकूण संख्या 31,67,323 पर्यंत पोहोचली, त्यात 2404585 रुग्णांची कोरोनावर मत केली आहे. तर 58390 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह सध्या देशात कोरोना विषाणूची 704,348 सक्रिय प्रकरणे आहेत. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की देशात उच्च चाचणीमुळे संक्रमणाचा प्रसार नियंत्रित करण्यास मदत झाली आहे. वेळेवर चाचणी, त्वरित आयसोलेशन आणि प्रभावी उपचार या दिशेने पहिले पाऊल म्हणून, उच्च चाचणीमुळे संक्रमणाचा प्रसार मर्यादित करण्यास मदत झाली आहे.

मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले की, यापूर्वी म्हटले होते की बरे झालेल्या आणि कोविड -19 सक्रिय प्रकरणांमधील दरी वाढत आहे ,कारण बरे झालेल्या लोकांची संख्या सक्रिय प्रकरणांच्या तुलनेत तीन पट आहे.