भिंत कोसळल्यानंतर तमिळनाडूमध्ये 400 पेक्षा जास्त दलितांनी स्वीकारला ‘इस्लाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या कोईम्बतुर जिल्ह्यात जवळपास 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तमिल पुलीगल काची नावाच्या एका दलित संघटनाने दावा केला की 5 जानेवारीनंतर जवळपास 40 कुटूंबांनी धर्मपरिवर्तन केले आणि हे पुढेही सुरु राहिलं.

दलितांच्या अचानक इतक्या मोठ्या संख्येने धर्म परिवर्तन करण्यामागचे कारण भिंत कोसळणे असे सांगितले जात आहे. ज्यात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. ही भिंत जातीची भिंत म्हणून ओळखली जात होती, जी दलित समुदाय आणि इतर लोकांमध्ये एक बाधा म्हणून पाहिली जात होती. दलित ग्रामस्थांनी दावा केला की त्यांच्या समुदायाच्या लोकांना कमी दर्जाचे दाखवण्यासाठी ही भिंत तयार करण्यात आली होती.

तमिळ पुलिगन काचीचे राज्य सचिव इलवेनिल यांनी मेट्टुपलायममध्ये 2 डिसेंबरला भिंत कोसळण्याची घटना घडली होती, यावर बोलताना ते म्हणाले की या धर्म परिवर्तनामागचे कारण मेट्टुपलायममध्ये 17 लोकांचा मृत्य आहे. हे लोक इस्लाम धर्म पसंद करत होते आणि नियमित मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठन करत होते.

इस्लाम स्वीकारणाऱ्या दलितांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या इच्छेने धर्मांतरण केले आहे ना की कोणत्याही दबावाने. एकाने सांगितले की मागील 3 वर्षांपासून मी इस्लामने प्रेरित होतो आणि आता मी धार्मिक कायदे आणि सिद्धांतिक कारणाने या धर्माचे पालन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कोणा दुसऱ्यांच्या सांगण्याने घेतला नाही. इस्लाम प्रामाणिकपणे स्वीकराला आहे आणि स्वेच्छेने मुस्लिम नाव स्वीकारले आहे.

पहिल्यांदा पंगुडी असलेले आणि आता इस्लाम धर्म स्वीकाराने बानू म्हणाले की, या धर्माद्वारे स्वातंत्रता, जातिगत भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याची एकमात्र पद्धत आहे. मुस्लिम एकमात्र असे लोक आहेत, जे कोणताही भेदभाव करत नाहीत आणि आमच्याकडे व्यक्तीसमान पाहतात. म्हणून आम्ही हा धर्म स्वीकारला.

धर्म परिवर्तन करणाऱ्या रविचंद्रन यांनी रईस पोलिसांवर धमकी दिल्याचा आरोप लावला आहे, जे लोक कायदेशीर पद्धतीने धर्मांतर करत आहेत, त्यांना पोलिसांद्वारे धमकी दिली जात आहेत यामुळे अनेक लोक धर्मांतराबाबत स्पष्ट बोलत नाहीत. तर अनेक लोक असे ही आहेत जे अधिकाऱ्यांना भीतीने धर्मांतराची माहिती देत नाहीत.

तमिल पुलिगल काचीच्या सदस्यांनी सांगितले की त्यांच्यासह सततचा भेदभाव, हल्ला आणि अपमान केले जाते. त्यांना अस्पर्श मानले जाते आणि त्यांना मंदिरात प्रवेश करणे आणि दुसऱ्यांच्या दुकानात चहा पिण्याची देखील परवानगी नाही. त्यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये घोषणा करत आसपासच्या जिल्ह्यातील 3,000 लोकांना जानेवारी 2020 मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार करतील.

परंतु दलितांच्या या निर्णयाने ग्रामस्थांचा एक वर्ग नाराज आहे. ते दावा करतात की फक्त मुठभर लोक या संघटनेशी संबंधित आहेत. त्या लोकांनी धर्मांतरण केले आणि अफवा पसरवत आहेत की हजारो लोकांचे धर्म परिवर्तन होत आहे.

तर एक ग्रामस्थ कन्नम म्हणाले की, आमचा भगवान विष्णुवर विश्वास आहे, आम्ही कधीही धर्मपरिवर्तन करणार नाही. हे सर्व लोक माझ्या कुटूंबाप्रमाणे आहेत. येथे कोणीही धर्मपरिवर्तन करणार नाही.