राज्यात साडेचार हजार जणांना डेंग्यू, स्वाइन फ्लूची लागण, आतापर्यंत १२९ बळी!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

यंदा राज्यभरात ४६६७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. त्यांपैकी अठरा रुग्ण दगावले आहेत. तर १२३१ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले. त्यातील १११ रुग्णांचा मृत्यू झाला. कोल्हापूरमध्ये ५ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात एकूण चार रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. वर्धा, सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक, तर नाशिक, जालना, वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रुग्ण डेंग्यूमुळे दगावला आहे. मुंबईमध्ये चार रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. कोल्हापूर महापालिकेत ११८६, नाशिक महापालिकेत ४५२, मुंबई महापालिकेतील ४२६, तर पुणे महापालिकेत २७८ रुग्ण आढळले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’930bdddd-c78b-11e8-b73b-1579d55b496d’]

राज्यभरात स्वाइन फ्लू या आजाराने आपले हात पाय पसरले असून यंदा १२३१ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले असून त्यांपैकी सर्वाधिक रुग्ण पुणे आणि नाशिक जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये आढळले आहेत. राज्यभरात जानेवारी २०१८ पासून एकूण १११ रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील पस्तीस, तर नाशिक जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नातू पाहिजे म्हणून वाद घालणाऱ्या आईचा मुलाने केला खून

२०१७ मध्ये राज्यात स्वाइन फ्लूमुळे ७८८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलै २०१८ पर्यंत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले नाहीत. राज्याच्या बहुतांश भागात आढळलेले स्वाइन फ्लूचे रुग्ण जुलैनंतर लागण झालेले आहेत. आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, गरोदर महिला अशा सुमारे एक लाख २८ हजार नागरिकांना आरोग्य विभागातर्फे स्वाइन फ्लूची लस देण्यात आली, त्यापैकी पंचावन्न हजार सहाशे चाळीस नागरिक पुणे विभागातील आहेत. राज्यातील ४८७ रुग्णांना चिकुनगुनियाची लागण झाली असून त्यांपैकी सर्वाधिक १०० रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळले आहेत. सांगली जिल्ह्यात ३९, नाशिक जिल्ह्यात २८, पुणे महापालिका क्षेत्रात १५४ तर नाशिक महापालिका क्षेत्रात ४३ रुग्ण आढळले आहेत.

[amazon_link asins=’B00650LGAW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a525a84c-c78b-11e8-8c95-5f134f6519a0′]

You might also like