Coronavirus : भारतातील 50 हून अधिक डॉक्टर अन् मेडिकल स्टाफ ‘कोरोना’ पॉझिटीव्ह ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना विषाणू भारतात आपले पाय पसरवत आहे, तर या धोकादायक विषाणूची लढाई लढणारे अनेक डॉक्टरही या आजाराच्या कचाट्यात आले आहेत. आतापर्यंत, ५० पेक्षा जास्त डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांमध्ये कोविड – १९ सकारात्मक असल्याचे आढळले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सरकार या ट्रेंडवर बारीक नजर ठेवून आहे कि, हे संक्रमित झालेले डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी रूग्णाच्या उपचारा दरम्यान संक्रमित झाले आहेत की त्यांच्या स्वतःच्या कामाच्या क्षेत्राबाहेर कोणतीही कॉन्टॅक्ट हिस्ट्री आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘वैद्यकीय कर्मचार्‍यांची ५० हून अधिक प्रकरणे अशी आहेत ज्यांची चाचणी सकारात्मक झाली आहेत. परंतु असे नाही की प्रत्येकाला त्यांच्या रूग्णांच्या उपचारादरम्यान संसर्ग झाला. काही प्रकरणांमध्ये असे दिसून आहे आहे की, अलीकडेच ते परदेशातून प्रवास करून परत आलेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. जेणेकरून या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग कोठून आला याची योग्य प्रकारे माहिती मिळू शकेल.

वैयक्तिक संरक्षक उपकरणांची कमतरता ही रुग्णालयांमधील आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची मोठी समस्या आहे. त्यांच्या कमतरतेमुळे, कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मोठा धोका असू शकतो. इटलीमधील रुग्णालयात कोविड १९ रूग्णांच्या उपचारादरम्यान, वैद्यकीय कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यापैकी बऱ्याच जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोविड १९ सकारात्मक घटनांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचा धोकाही वाढत आहे.

रुग्णालयांमध्ये PPEs पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी सरकारने कित्येक पावले उचलली आहेत. देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत असताना परदेशातून त्वरित पुरवठा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराचे एक डॉक्टरही कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर जोडप्याची चाचणीही सकारात्मक झाली आहे. या जोडप्यात पत्नी नऊ महिन्यांची गरोदर आहे.