केंद्रीय सुरक्षा दलात ‘CSF’ ८४,००० जास्त जागा रिक्त, लवकरच होउ शकते मेघाभरती

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये ८४, ००० हजार जागा रिक्त आहेत. मंगळवारी सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. या जागा भरण्यासाठी लवकरच सरकारकडून पाऊले उचलली जाऊ शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी असेल. लोकसभेत एका लिखित प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. सेवानिवृत्ती, स्वैच्छिक निवृत्ती आणि शहीद जवान या कारणामुळे जागा रिक्त झाल्या आहेत. सध्या ८४,०३७ जागा रिक्त आहेत.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अंतर्गत केंद्रीय रिजर्व पोलीस बल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा बल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), भारत- तिबेट सीमा बल (आईटीबीपी) आणि आसाम राइफल्स या दलातील जागा रिक्त आहेत. गेल्या सरकारमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी देखील ही माहिती दिली होती.

कोणत्या दलात किती जागा रिक्त

रिक्त जागा

सीआरपीएफ : २२,९८०
बीएसएफ : २१,४६५
एसएसबी : १८, १०२
सीआयएसएफ : १०,४१५
आयटीबीपी : ६,६४३
आसाम रायफल्स: ४, ४३२
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे