‘सरपंच जनतेतून हवा’ ; CM ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाला ब्रेक ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारानं शिक्कामोर्तब केलं होतं. परंतु राज्यातील नव्या ठाकरे सरकरानं मात्र जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात केलेला कायदा रद्द केला होता. परंतु आता हाजारो ग्रामपंचायतींनी मात्र सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून व्हावी असा ठराव मंजूर करत ठाकरे सरकारच्या निर्णयाला धक्का दिला आहे.

महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी माहिती देत म्हटलं आहे की, “जवळपास 9 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींनी सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून व्हावी असा ठराव मंजूर केला आहे.” ठाकरे सरकार आता या ठरावाबबात नेमका काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अडीच वर्षांपूर्वी भाजप सरकारनं जनतेतून सरपंच, नगराध्यक्षांची निवड आणि नगरपालिकांमध्ये चार प्रभागांची पद्धत असे दोन निर्णय घेतले होते.

दरम्यान जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होते, “जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही अशी तक्रार आहे. बऱ्याचदा निवडून आलेला सरपंच वेगळ्या विचारांचा असतो आणि सदस्य वेगळ्या विचारांचे असतात. याचा विकास कामांवर परिणात होतात” असंही त्यांनी म्हटलं होतं.