झोपण्यापुर्वी ‘हे’ काम करा, सकाळी चेहरा दिसेल एकदम ‘सुंदर’ अन् ‘चमकदार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात त्वचा कोरडी झाल्यामुळे आपली चमक कमी होण्यास सुरुवात होते. यामुळे चेहरा निस्तेज, कोरडा आणि गडद दिसतो. यासाठी बर्‍याच मुली वेगवेगळ्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, त्यातील केमिकलमुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. आपण २ घरगुती उपाय करूनही समस्या कमी करू शकता, तसेच सर्व गोष्टी नैसर्गिक असल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही.

झोपेच्या आधी चेहर्‍यावर दूध लावा
दुधामध्ये असलेले पौष्टिक घटक शरीराबरोबरच त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरतात. तसेच चेहर्‍याची मसाज केल्यानंतर मृत त्वचेची दुरुस्ती करून त्वचेचे खोल पोषण होते. त्यामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार राहते आणि त्वचेचा ओलावा टिकून राहतो.

लावण्याची व काढण्याची पद्धत …
१) झोपेच्या आधी फेस वॉशने चेहरा धुवा आणि टॉवेलने कोरडा करून घ्या.
२) नंतर कच्च्या दुधाने हलक्या हातांनी चेहऱ्यावर मालिश करा.
३) दुध पूर्णपणे कोरडे होईपर्यंत त्वचेवर मालिश करा.
४) अशाप्रकारे चेहऱ्यावर दुधाचा थर तयार होईल.
५) रात्रभर तसेच राहू द्या.
६) सकाळी स्वच्छ पाण्याने धुवा.
सलग ७ दिवस असे केल्याने आपल्याला फरक दिसेल.

दूध लावण्याचे फायदे …
१) यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ आणि चमकदार होईल.
२) त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि त्यामध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहील.
३) डाग, गडद वर्तुळे दूर होऊन चेहरा सुंदर, चमकणारा, मऊ आणि तरुण दिसेल.

स्क्रब चेहऱ्याची चमक वाढवेल
त्वचेवर धूळ , माती, घाणीमुळे डाग वाढू लागतात, गडद वर्तुळे, सुरकुत्या, कोरडेपणा यासाठी त्वचेला स्क्रबिंग आवश्यक आहे. यासाठी तीळ तेल आणि तांदूळ पावडरपासून बनविलेले स्क्रब सर्वोत्कृष्ट असेल.

स्क्रब बनवण्याची आणि लावण्याची पद्धत …
१) एका भांड्यात २ चमचे तांदूळ पावडर, १ मोठा चमचा तीळ तेल घाला.
२) नंतर फेसवॉशने चेहरा धुवा आणि टॉवेलने कोरडा करून घ्या.
३) तयार स्क्रबने हलक्या हातांनी चेहरा आणि मानेवर लावून ठेवा आणि ५ मिनिटे तसेच राहू द्या.
४) नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा.

स्क्रब करण्याचे फायदे …
१) तीळ तेल त्वचेचे मृत पेशी काढून नवीन त्वचा तयार करण्यात मदत करते.
२) त्वचेचे खोल पोषण झाल्याने ते बर्‍याच काळासाठी ओलावा टिकवून ठेवेल.
३) डाग, सुरकुत्या, गडद वर्तुळे इत्यादी दूर होऊन स्वच्छ, चमकदार, कोमल आणि तरुण त्वचा होईल.