धक्कादायक ! देशात चाइल्ड पॉर्नोग्राफीची 25000 प्रकरणं उघड, मुंबई-पुण्याचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफीवर बंदी आणण्यात आला आहे परंतु असे असताना 25 हजार पेक्षा अधिक चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ सोशल मीडिया साइट्सवर अपलोड केल्या गेल्याचा अहवाल समोर आला आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे. यासंबंधित अहवाल अमेरिकेकडून भारताला सोपावण्यात आला. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिड्रेन (एनसीएमइसी) कडून भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोकडे हा डेटा देण्यात आला आहे. अशा प्रकारची माहिती मिळावी यासाठी गेल्या वर्षी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

एका वृत्तानुसार यातील सर्वाधिक प्रकरणं दिल्लीतील आहेत. त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याखालोखाल गुजरात, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधून चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. प्रत्येक राज्याची आकडेवारी स्वतंत्रपणे आली नसली तरी महाराष्ट्रातून एकूण 1700 प्रकरणं समोर आली. ती सायबर विभागाकडे पाठवण्यात आली, तर इतर राज्यात देखील साधारण हिच परिस्थिती आहे.

हा अहवाल समोर आल्यानंतर आता देशभरात अटकसत्र सुरु झाले आहेत. एनसीएमइसीसोबत गेल्या वर्षी करार करण्यात आला, त्यातून भारताला ही माहिती मिळाली. 23 जानेवारीपर्यंत गेल्या पाच महिन्यात चाइल्ड पॉर्नोग्राफीची 25 हजार प्रकरण समोर आली आहेत. अशा प्रकारे डाटा शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे असे महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्यांने सांगितले.

मुंबईत उघडकीस आणि 500 प्रकरणं –
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती संबंधित विभागांकडे पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर काही गुन्हा दाखल करणे बाकी आहेत. मुंबई, ठाणे, पुणे या शहरात या घडना सर्वाधिक उघडकीस आल्या. मुंबईत 500 प्रकरणं उघड झाली. दिल्ली, गुजरात आणि केरळमध्ये याआधीच कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

काय आहेत चाइल्ड पॉर्नोग्राफीचे निकष –
ही माहिती गोळा करण्यासाठी बातम्या, इंटरनेट सर्विस देणारे आणि काही सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. नग्नता आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव या आधारे व्हिडिओ तपासणीसाठी फॉरवर्ड केले जातात. पॉक्सो अ‍ॅक्टमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफी अंतर्गत, फोटो, व्हिडिओ, डिजिटल किंवा संगणकाच्या साहाय्याने तयार केलेले छायाचित्र, जे बालकांची आहेत किंवा जे छायाचित्र मॉडिफाइड करुन वास्तविक मुलांसारखी वाटणं इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like