‘कोरोना’च्या भीतीनं काढ्याचं अतिसेवन करत असाल तर वेळीच व्हा सावध ! येऊ शकतात ‘या’ समस्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणं ही फ्लू सारखीच आहेत. त्यामुळं साधा ताप, सर्दी झाली तरीसुद्धा लोक घाबरत आहेत. काही लोक कोरोना पासून वाचण्यासाठी काढ्याचंही सेवन करत आहेत. तुम्ही काहीही खा किंवा प्या परंतु त्याचं सेवन जर प्रमाणात नसेल तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला सहन करावे लागतात. कोरोनाच्या काळातही लोक अनेक प्रकारच्या काढ्याचं सेवन करत आहेत. काही लोक डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत तर काही लोक इंटरनेटवर पाहून काढा तयार करत आहेत. परंतु तुम्ही याचं सेवन प्रमाणात केलं नाही तर तुम्हाला अनके समस्या येण्याची शक्यता असते. त्या समस्या कोणत्या आहेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

काढ्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम –

1) काढ्याचं अतिसेवन केलं तर शरीरातील उष्णता वाढते.

2) काही लोकांना अॅसिडीटी, छातीत जळजळ होणं, हात पायांची आग होणं अशी लक्षणं दिसू शकतात.

3) यात वापरल्या जाणाऱ्या काळी मिरी आणि दालचिनी यांचं अतिसेवन झालं तर पोटदुखीची समस्या येऊ शकते.

4) गुळवेल, अश्वगंधा अशा औषधी वनस्पतींचा ओव्हरडोज झाला तर अनेक शारीरिक समस्या येण्याची शक्यता असते.

हेही लक्षात असू द्या
काढ्यानं आपल्या शरीराला फायदा तर मिळतोच, परंतु त्याचं प्रमाणात सेवन असेल तरच. म्हणून काढ्याचं सेवन प्रमाणात असू द्या. याशिवाय कोणताही काढा घेताना डॉक्टरांचा सल्लाही नक्की घ्यावा. जेणेकरून त्या पदार्थांचं प्रमाण किती घ्यावं हेही तुम्हाला कळेल. महत्त्वाचं म्हणजे काही पदार्थांची काहींना अॅलर्जीही असू शकते.