Overweight And Obesity | ओव्हरवेट किंवा लठ्ठपणाने वाढतो ‘या’ 7 जीवघेण्या आजारांचा धोका ! तात्काळ व्हा सावध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Overweight And Obesity | लठ्ठपणा (Obesity) ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील चरबी किंवा चरबीचे प्रमाण लक्षणीय वाढते. लठ्ठपणाचे (Overweight) कारण म्हणजे अनहेल्दी लाइफस्टाइल (Unhealthy Lifestyle), चुकीच्या खाण्याच्या सवयी (Bad Eating Habits), अति खाणे (Overeating), जंक फूड (Junk Food), फास्ट फूड (Fast Food), झोप न लागणे (Insomnia), तणाव घेणे (Stress), शारीरिक हालचालींचा अभाव (Lack of Physical Activity), आनुवंशिकता (Heredity) इत्यादी. आपणही आपल्या आजूबाजूला नजर टाकली, तर दर 10 पैकी किमान 4-5 जण वजन वाढण्याच्या समस्येने (Overweight And Obesity) त्रस्त असतात.

 

जास्त वजन असलेल्या व्यक्तीला अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. वास्तविक, जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात चरबी (Fat) साठू लागते, तेव्हा ती हाडे (Bones) आणि इतर अवयवांवर दबाव टाकू लागते. त्याच वेळी, ती हार्मोन्स (Hormones) आणि चयापचय (Metabolism) देखील बदलू शकते, जे शरीरासाठी हानिकारक आहे.

 

लठ्ठपणाचा त्रास (Overweight And Obesity) असलेल्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स (Body Mass Index) 30 किंवा त्याहून अधिक असतो. ऑनलाइन कॅल्क्युलेटरने कोणीही त्यांचा बीएमआय (BMI Calculator) शोधू शकतात. यासाठी फक्त उंची आणि वजन आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, लठ्ठपणा असलेल्या लोकांना खालील रोगांचा धोका वाढू शकतो.

 

लठ्ठपणामुळे वाढतो या रोगांचा धोका (Obesity Increases Risk of These Diseases)

1. टाइप 2 डायबिटिज (Type 2 Diabetes)
जेव्हा रक्तातील ग्लुकोज (Glucose) किंवा ब्लड शुगरचे (Blood Sugar) प्रमाण खूप जास्त होते तेव्हा टाइप 2 डायबिटिज होतो. टाइप 2 डायबिटिज असलेले 10 पैकी 8 लोकांचे वजन जास्त किंवा लठ्ठ आहेत. कालांतराने, हाय ब्लड शुगरमुळे (High Blood Sugar) हृदयविकार (Heart Attack), पक्षाघात (Paralysis), मूत्रपिंडाचे आजार (Kidney Disease), डोळ्यांच्या समस्या (Eye Problems) आणि इतर आरोग्य समस्या (Health Problems) होऊ शकतात.

 

टाईप 2 डायबिटिज होण्याचा धोका कमी करण्यासाठी, आपल्या एकूण शरीराच्या वजनाच्या 5 ते 7 टक्के वजन कमी करण्याची आणि दररोज व्यायाम (Exercise) करण्याची शिफारस केली जाते.

 

2. हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure)
लठ्ठ लोकांना अनेकदा हाय ब्लड प्रेशरची समस्या (High BP Problem) असते. हाय ब्लड प्रेशर (High BP) अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधून रक्त सामान्यपेक्षा वेगाने वाहते. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयावर दबाव पडतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे (Blood Vessels) देखील नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke), किडनी रोग आणि मृत्यूचा धोका वाढतो.

 

3. हृदयाचे आजार (Heart Disease)
लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर (Heart Failure) किंवा हृदयाची असामान्य धडधड यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हाय ब्लड प्रेशर, रक्तातील चरबीची (Fats in Blood) असामान्य पातळी आणि हाय ब्लड शुगरमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

 

अशावेळी शरीराच्या एकूण वजनाच्या 5 ते 10 टक्के वजन कमी करून हृदयविकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो. म्हणजेच, जर तुमचे वजन 80 किलोच्या आसपास असेल, तर तुम्ही 8-16 किलो वजन कमी केले पाहिजे. ज्याद्वारे ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल लेव्हल आणि रक्त प्रवाह सुधारला जाऊ शकतो.

 

4. ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis)

ऑस्टियोआर्थरायटिस ही एक अतिशय सामान्य आणि दीर्घकाळ टिकणारी समस्या आहे, ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज येते.
जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे सांधे आणि कार्टिलेजवर (Cartilage) अतिरिक्त दबाव पडतो,
ज्यामुळे ऑस्टियोआर्थराइटिसचा धोका (Risk of Osteoarthritis) वाढू शकतो.

5. मेटाबॉलिक सिंड्रोम (Metabolic Syndrome)
लठ्ठ लोकांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोममुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे हृदयविकार,
मधुमेह (Diabetes) आणि पक्षाघाताचा धोका (Risk Of Paralysis) वाढू शकतो.

 

6. फॅटी लिव्हर रोग (Fatty Liver Disease)
फॅटी लिव्हर रोग ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लिव्हरमध्ये चरबी जमा होते. फॅटी लिव्हरमुळे लिव्हरचे नुकसान,
सिरोसिस (Cirrhosis) किंवा लिव्हर (Liver) निकामी होऊ शकते.

 

7. किडनीचा आजार (Kidney Disease)
किडनीच्या आजाराचा सरळ अर्थ असा होतो की तुमची किडनी निकामी (Kidney Damage) झाली आहे
आणि किडनी पूर्वीप्रमाणे रक्त फिल्टर (Blood Filter) करू शकणार नाही.

 

लठ्ठपणामुळे मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका वाढतो, जी किडनीच्या आजाराची सर्वात सामान्य कारणे आहेत.
तुम्हाला मधुमेह आणि रक्तदाब नसला तरीही लठ्ठपणामुळेच किडनीच्या आजाराला चालना मिळते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Overweight And Obesity | health risks of overweight and obesity type 2 diabetes heart disease kidney disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी होता भाव, वर्षभरात ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या

 

Mumbai High Court On Sameer Wankhede | वानखेडेंची याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने हायकोर्ट संतप्त

 

Ahmednagar Crime | 10 वी, 12 वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग