अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत ! कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील घरांमध्ये घुसले पाणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावात रात्री दोन ते अडीच तास झालेल्या मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गावातील शेकडो घरामध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्राह्मणगावाजवळून जाणा-या नाल्याचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थांच्या घरात दोन ते अडीच फुट पाणी होते. यामध्ये संसारोपयोगी भांडे, कपडे, घरातील शालेय विधार्थ्यांच्या वह्या, पुस्तके पुरात वाहून गेले तर सर्व धान्य ओले झाले होते. तसेच एक गाय तसेच काही शेळ्या, मेंढ्या मृत झाल्या आहेत. घराच्या भिंती पडल्या आहेत.

नुकसानीचे केले पंचनामे
प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी भेट देऊन पाहणी करून तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व काळे उधोग समूहाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी ग्रामस्थांच्या नाष्टा व जेवणाची सोय केली.

आरोग्यनामा ऑनलाइन –

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट

ऊसतोड महिलांचे गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरण : दोषी डॉक्टरांवर कारवाई होणार

सायनसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही काळजी घेणे गरजेचे