मुस्लिमांविषयीचा मोदींचा कळवळा खोटा : ओवेसी

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत अल्पसंख्याकांविषयी व्यक्त केलेलं मत हा केवळ देखावा आहे, खोटेपणा आहे. अशी टीका एमआयएमचे खासदार असाद्दुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी शनिवारी सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदारांचे अभिनंदन केले. तेव्हा या बैठकीत पाच वर्षात अल्पसंख्याकांच्या मनात जी भिती निर्माण करण्यात आली ती काढायची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होते. त्यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत अल्पसंख्याकांविषयी व्यक्त केलेलं मत हा केवळ देखावा आहे, खोटेपणा आहे. मुस्लिमांविषयी एवढाच कळवळा होता तर भाजपने किती मुस्लिमांना तिकीटं दिलं ते सांगावं, असं ओवेसींनी सांगितलं.

गेल्या काही वर्षात देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनात भाजपविषयी भिती निर्माण करण्यात आली आहे. मतांच्या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी ही भिती निर्माण करण्यात आलीय. यापुढच्या काळात ही भिती त्यांच्या मनातून काढायची आहे, असे विचार पंतप्रधानांनी व्यक्त केले होते. आत्तापर्यंत सबका साथ सबका विकास ही घोषणा होती. आता त्यात सबका विश्वास हे नवं धोरण जोडण्यात येत आहे, असं मोदींनी म्हटलं होते.

मोदींच्या या भाषणाचा समाचार घेत ओवेसी यांनी मोदींवर टीका केली आहे. भाजपचे 303 खासदार निवडून आले. यात किती मुस्लिम खासदार आहेत ते त्यांनी सांगावं? पंतप्रधानांनी हा देखावा बंद करावा, असं ओवेसी यांनी म्हटलं.