ओवेसींनी सांगितले राहुल गांधींच्या वायनाडमधील विजयाचे ‘रहस्य’ !

तेलंगणा : वृत्तसंस्था – काँग्रेसला लोकसभेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी राहुल गांधींना केरळच्या वायनाड मतदार संघातून अभूतपुर्व यश मिळाले. परंतू त्यांना अमेठी गमवावे लागले. वायनाडमधील राहुल गांधीना यश मिळाल्यानंतर आता यावरुन राजकारण, टीका होण्यास सुरुवात झाली आहे. आता तर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी थेट राहुल गांधींवरच निशाणा साधला आहे. राहुल गांधींना वायनाडमध्ये विजय मिळाल्याचे कारण तेथील मुस्लिम लोकांची बहूता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले की, काँग्रेस नेता राहुल गांधी अमेठीत हरले मात्र वायनाडमधून जिंकून आले. हे त्यामुळे तर नाहीना झाले, वायनाडमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ओवेसी पुढे म्हणाले की, तुम्ही लोक काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षाने सोडू इच्छित नाहीत परंतु हे देखील लक्षात असू द्या की त्यांच्याकडे ना की ताकद आहे किंवा ना कोणताही विचार. ते मेहनत देखील करत नाहीत. भाजप कुठे हारले? फक्त पंजाबात, कारण तेथे सिख आहेत ? भाजप जर आणखी कुठेही हारली असेल तर ती तेथील प्रादेशिक पक्षांमुळे ना की काँग्रेसमुळे असे म्हणत ओवेसीने काँग्रेसवर कठोर टीका करत काँग्रेस कमजोर झाल्याचे सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून 4 लाख 31 हजार 770 मतांच्या फरकाने जिंकले. त्यांनी भाकपच्या पी.पी. सुनीर यांचा पराभव केला. सुनीर यांना 2 लाख 74 हजार 597 मते मिळाली. तर राहुल गांधींना 7 लाख 6 हजार 367 मते मिळाले.


ओवेसी यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी विचार केला की, आता नवीन हिंदुस्तान निर्माण होईल, आजाद, गांधी, नेहरु, आंबेडकर आणि त्यांच्या कोट्यावधी अनुयायांचा हिंदुस्तान असेल. मला अजून देखील विश्वास आहे की, या देशात आपल्याला आपली जागा मिळेल. आपल्याला कोणाची भिख नको, आणि नाही आपल्याला कोणाच्या भिखेवर जगाचे आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर आणि भाजपच्या नेत्यांकडून होणाऱ्या विधानांवर भाष्य करत टीका केली. ओवेसी म्हणाले की, भाजपच्या नेत्याकडून मुस्लिम नेत्याबद्दल येणारी वक्तव्य त्या नेत्यासाठी काही मोठी बाब नाही, कारण ते कोणत्याही मुस्लिम नेत्यांना पाहतात तर त्यांना ते दहशतवादीच वाटतात.

आरोग्यविषयक वृत्त –

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही
मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

महिन्यात पुन्हा एकदा मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय