‘कोरोना’ वॅक्सीन कोविशील्डचा इमर्जन्सीमध्ये होऊ शकतो वापर ? मंजूरीसाठी लवकरच अर्ज करणार सीरम इन्स्टीट्यूट

नवी दिल्ली : सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाल यांनी शनिवारी म्हटले की, लवकरच कोविशील्डचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकतो. यासाठी सीरम पुढील दोन आठवड्यात प्राधिकरणाकडे अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पाला शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ पूनावाला म्हणाले, आम्ही पुण्यात आणि आमच्या नवीन परिसर मांजरीमध्ये सर्वात मोठ्या महामारीच्या स्तराच्या सुविधांची निर्मिती केली आहे. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या वेळी अनेक सविस्तर चर्चांसोबत या सुविधाही त्यांना दाखवल्या.

व्हॅक्सीन सुरूवातीला भारतात वितरित होईल
सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ म्हणाले, व्हॅक्सीन आणि व्हॅक्सीनच्या उत्पादनावर पंतप्रधानांकडे खुप माहिती आहे. आम्ही हैराण होतो की, त्यांना अगोदरच याबाबत खुप माहिती होती. विविध व्हॅक्सीन आणि त्यांच्या आव्हानांबाबत सविस्तर चर्चेसह त्यांना जास्त काही समजून घेण्याची आवश्यकताच पडली नाही. व्हॅक्सीनच्या वितरणाबाबत पूनावाले म्हणाले, व्हॅक्सीन सुरूवातीला भारतात वितरित केली जाईल, नंतर इतर देशांकडे पाहू ज्यामध्ये प्रामुख्याने आफ्रीका आहे. एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड द्वारे यूके आणि यूरोपीय बाजारात लक्ष ठेवले जात आहे. आमची प्राथमिकता भारत आणि कोवॅक्स देश आहेत.

उपस्थित टीमशी सुद्धा पंतप्रधानांची चर्चा
कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मोदी यांनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या दौर्‍यात उपस्थित टीमसोबत चर्चा केली, ज्यांनी पंतप्रधानांना को व्हॅक्सीन उत्पादनात पुढे तेजी येण्याबाबत आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती दिली.

अदर पूनावाला म्हणाले, जगभरात आता सर्वजण मोठ्या स्तरावर आणि स्वस्त किमतीत व्हॅक्सीन मिळवण्यासाठी भारतावर अवलंबून आहेत, कारण सर्वांनाच अगोदरच माहिती आहे की, 50-60 टक्के लसी भारतात बनवल्या जातात.

भारतात कोविड-19 च्या लसीच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांच्या दौर्‍याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे येथे आले होते. पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरसच्या विरूद्ध व्हॅक्सीनसाठी जागतिक औषध कंपनी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी भागीदारी केली आहे.