Oxford लस देण्यात झाली मोठी चूक; लपवली ‘ही’ मोठी माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनावरील अनेक लशी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन यांसारख्या भारतीय बनावटीच्या लस आहेत. पण जगात सर्वाधिक वापर हा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका या लसीचा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. पण आता त्यावर लस बाजारात आली आहे. त्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनावरील प्रभावी लस म्हणून ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका या लसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनंतर ही लस पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीदरम्यान 1500 स्वयंसेवक सहभागी झाले होते. मात्र, या सर्वांना चुकीची लस दिली गेली. इतकेच नाही तर ही चूक स्वयंसेवकांपासूनही लपविण्यात आली. याचा खुलासा ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने एका कागदपत्रांच्या आधारावर केला आहे.

स्वयंसेवकांना पारदर्शी माहिती नाहीच

संशोधकांनी स्वयंसेवकांना लशीबाबत पारदर्शक माहिती दिली नाही. मात्र, चाचणीदरम्यान केल्या गेलेल्या बदलांची पूर्ण माहिती त्यांना देणे गरजेचे होते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आपातकालीन वापरासाठी मान्यता

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची लसीला UK, युरोपीय संघ आणि भारतासह अनेक देशांमध्ये आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. सर्वात आधी UK मध्ये या लसीला मान्यता मिळाली होती. त्यानंतर 4 जानेवारीपासून लोकांना ही लस देण्याचे सुरु केले.