Oxford ची ‘कोरोना’च्या वॅक्सीनवरील सर्वात विश्वासदर्शक ट्रायल झालं खुपच चांगलं, चमत्काराची अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूच्या लसीवर काम सुरु असून सर्वांच्या नजरा ऑक्सफोर्ड विद्यापीठात सुरु असलेल्या चाचणीकडे लागले आहे. आतापर्यंत, या विद्यापीठाने 1000 जणांवर लसीची चाचणी केली आहे. याच आधारावर चाचणी खूप चांगली झाल्याचे मानले जात आहे. यापुढील टप्प्यात, लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील 10260 लोकांनी चाचणीसाठी नोंदणी केली आहे. या टप्प्यात ही लस वेगवेगळी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना देण्यात येणार आहे. त्यानंतर याचे परिणाम काय दिसून येतात हे पाहिले जाणार आहे.

ऑक्सफोर्ड वॅक्सिन ग्रुपचे प्रमुख अँड्र्यू पोलार्ड म्हणाले, क्लिनिकल अभ्यास चांगल्या पद्धतीने होत आहे आणि आम्ही ही लस प्रौढांना देणार असून या लसीला कसा प्रतिसाद मिळतो याचे परिक्षण करणार आहोत. तसेच ही लस बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या देशात उपयोगी पडते का ते पाहीले जाईल. चाचणीसाठी ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली त्यांचे आभारी आहोत. तसेच ही लस मानवाचे कोरोना सारख्या साथीच्या आजारापासून संरक्षण करू शकते का हे पाहीले जात आहे. शास्त्रज्ञांना या वॅक्सिनकडून सप्टेंबर पर्यंत चमत्कारीक परिणामांची अपेक्षा आहे. कारण तोपर्यंत लवकरात लवकर रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टप्प्यात ही लस 18 वर्षावरील लोकांचा कोरोनाच्या संक्रमणापासून कशा पद्धतीने संरक्षण करते यावर अभ्यास केला जाणार आहे. दुसरीकडे, जेनर इन्स्टिट्यूटमध्ये लसीकरण शास्त्रातील प्राध्यापिका सारा गिलबर्ट म्हणाल्या, आम्ही आधीच 55 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु ते पहिल्या टप्प्यातील अभ्यासासाठी योग्य नव्हते. त्यामुळे आता आम्ही 18 वर्षा वरील गटातील लोकांचा यामध्ये समावेश करून त्यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणार आहोत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने मोठ्या प्रमाणावर लस तयार करण्यासाठी आधीपासून अॅस्ट्रॅजेनेका या मोठ्या औषधी कंपनीशी करार केला आहे. जे संशोधन यशस्वी झाल्यास लगेचच बाजारासाठी उत्पादन सुरु करेल.