Oxford च्या वॅक्सीनमुळं आपेक्षा उंचावल्या, आता भारतातही होणार मानवी परीक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना विरुद्धच्या लसीचे संशोधन जगभरातील अनेक देश करत आहेत. काही देशांना यामध्ये यश आल्याचे दिसून येत आहे. कोरोना लसीची प्रतिक्षा जगभरातील सर्वच लोकांना आहे. अशातच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने अखेर GOOD NEWS दिली आहे. ऑक्सफर्डच्या लशीचा मानवी चाचणी परिणाम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम सकारात्मक आले आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता या लशीमुळे आशा पल्लवित झाल्या असून भारतातही लवकरच या लशीचं ह्युमन ट्रायल सुरु होणार आहे.

पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डच्या लशीचं भारतात ह्युमन ट्रायल करण्याचा विचार करत आहे. यासाठी संस्थेने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DGCI) ही परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर ऑगस्टपासून या लशीचं ट्रायल केलं जाईल. ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि अस्ट्राझेनका कंपनीने तयार केलेली ही लस आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही या संस्थेशी करार केला आहे.

सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला म्हणाले, ऑक्सफर्ड लशीच्या चाचणीचा सकारात्मक रिझल्ट पहायला मिळला. आम्ही त्याबाबत खूप आनंदी आहोत. या लशीचं भारतातही ट्रायल व्हावं यासाठी डीजीसीआयकडे परवानगी मागणार आहे. परवानगी मिळताच भारतातही या लशीचं ट्रायल सुरु होणार आहे. इतकंच नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या लशीचं उत्पादनही करणार आहोत. जवळपास एक अब्ज डोसचा आम्ही पुरवठा करणार असल्याचे अदार पुनावाला यांनी सांगितले. दरम्यान या लशीची किंमत एक हजार रुपये असणार असल्याचे देखील अदार पुनावाला यांनी सांगितले.

WHO चा सबुरीचा सल्ला
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे संशोधित केलेल्या या लशीच्या चाचण्याचा अहवाल The Lancet या नामवंत विज्ञान प्रकाशनामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये ही लस सुरक्षित आणि आशादायी असल्याचे म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा या लशीचं स्वागत केलं आहे. पण तरीही अजून खूप काही बाकी आहे, असा सबुरीचा सल्ला WHO ने दिला आहे.

सप्टेंबरमध्ये लस येणार ?
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने डॉ. माईक रायन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, This is positive result, but again there is a long way to go. चाचणीचे परिणाम चांगले आहेत पण अजून भरपूर वेळ आहे, असं त्यांनी सांगितलं. सप्टेंबरमध्ये लस येणार असं सांगितलं जात असताना WHO ची ही प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.