COVID-19 : दिलासादायक ! ऐकमेव ‘कोरोना’ वॅक्सीन जी यशस्वी होऊ शकते यंदा, भारतात देखील होतंय उत्पादन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोरोना लस AZD1222 ने अपेक्षा वाढल्या आहेत. युरोपमधील अनेक देश ऑक्सफोर्डला या लसीची चाचणी यशस्वी करण्यासाठी मदत करत आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, या वर्षाच्या अखेरीस ही एकमेव लस यशस्वी घोषित केली जाऊ शकते. विशेष म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची कोरोना लस AZD1222 इतर लस कँडिडेट्सपेक्षा खूपच पुढे आहे. ही लस भारतासह अनेक देशांमध्ये तयार केली जात आहे. पश्चिमेकडील बरेच देश या लसीला सर्वोत्तम म्हणून मनात आहेत.

सुरुवातीच्या आणि कमी लोकांवर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये AZD1222 लसीचा परिणाम चांगला दिसून आला आहे. हजारो लोकांना मोठ्या चाचण्यांमध्ये लस दिली जात आहे, ज्यांचे परिणाम येणे अजून बाकी आहेत. इटलीच्या रोममधील अ‍ॅडव्हेंट कंपनीत मोठ्या चाचण्यांसाठी लस पूरक पदार्थ तयार केले गेले.

अहवालानुसार, AZD1222 लसीसाठी युरोपीय देश ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या समोर उभे ठाकले आहेत. गेल्या आठवड्यात इटली, जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँड्सने ऑक्सफोर्ड लसीच्या 40 कोटी डोससाठी डील केली. मोठ्या चाचणीनंतर, जर ही लस शासकीय संस्थांनी मंजूर केली तर अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) फारच थोड्या वेळात कोट्यावधी डोस तयार करेल. अमेरिका आणि ब्रिटन यांनी या कंपनीशी करार केला आहे.

इटलीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा म्हणाले की, ऑक्सफोर्डची लस सर्वात प्रथम येईल असे आमच्या वैज्ञानिकांना वाटते. सद्यस्थितीत, कोणतीही इतर कंपनी या वर्षाच्या अखेरीस त्यांची लस येईल असे म्हणत नाही. सध्या जगात कोरोना लसीवर 100 लॅब, युनिव्हर्सिटी आणि औषध कंपन्या कार्यरत आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, 11 लसी कँडिडेट क्लिनिकल टेस्टिंग करण्यास सक्षम आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की ऑक्सफोर्ड लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

यापूर्वी, ब्रिटनची औषधनिर्माण कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी सांगितले होते की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे लक्षावधी डोसचे उत्पादन सुरू झाले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ब्रिटन, स्वित्झर्लंड, नॉर्वे तसेच भारतातही या लस तयार केल्या जात आहेत. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले होते की साथीचा रोग जाहीर असेपर्यंत कंपनी लस उत्पादनातून नफा कमावणार नाही.