Oxford University च्या ‘कोरोना’ वॅक्सीनचं मानवी परिक्षण यशस्वी, भारताला मिळणार मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ब्रिटनच्या ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड -19 लसची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. ब्राझीलमध्ये घेण्यात आलेल्या मानवी चाचण्यांचे उत्कृष्ट परिणाम आले आहेत. या चाचण्यांमध्ये लसींनी विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक ChAdOx1 nCoV-19 (AZD1222) या लसीच्या संपूर्ण यशाबद्दल आश्वस्त आहेत. तसेच त्यांना खात्री आहे की सप्टेंबर 2020 पर्यंत ही लस लोकांना उपलब्ध करुन दिली जाईल. या लसीचे उत्पादन अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) करेल. त्याचबरोबर, भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) देखील या प्रकल्पात सहभागी आहे.

पुढील टप्प्यात 200 ते 300 लोकांवर होईल चाचणी

मानवी चाचणीचा निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर झाला नाही. अशी अपेक्षा आहे की याची अधिकृत घोषणा गुरुवारी ‘द लान्सेट’ मध्ये एका लेखाद्वारे केली जाईल. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीची मानवी चाचणी 15 लोकांवर केली गेली होती. आता याची तपासणी सुमारे 200-300 लोकांवर केली जाईल. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीने असा दावा केला आहे की या चाचणीत सामील झालेल्यांमध्ये अँटीबॉडीज आणि पांढऱ्या रक्त पेशी (T-Cells) विकसित झाल्या आहेत. त्यांच्या मदतीने मानवी शरीर संक्रमणास लढण्यासाठी तयार असू शकते.

लस अँटीबॉडीसह टी-सेल्स देखील बनवत आहे

आतापर्यंत उत्पादित बहुतेक लसी या अँटीबॉडी बनवतात. त्याचवेळी ऑक्‍सफर्डची लस अँटीबॉडीजसह पांढऱ्या रक्त पेशी (Killer T-cell) तयार करते. या प्रारंभिक यशानंतर, हजारो लोकांवर याची चाचणी घेतली जाऊ शकते. युनिव्हर्सिटीच्या या लसीच्या चाचणीत ब्रिटनमधील 8,000 आणि ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतील 6,000 लोकांचा समावेश आहे. ऑक्‍सफर्डची लस प्रथम ब्रिटनमधील मानवांवर वापरली गेली. यापूर्वी, अमेरिकन कंपनी मॉडर्नाची कोरोना लस ही आपल्या पहिल्या चाचणीत पूर्णपणे यशस्वी झाली होती.

भारताला लसीचे 50% डोस मिळतील

भारताची सीरम इन्स्टिट्यूट देखील ऑक्सफर्डच्या या प्रकल्पातील भागीदार कंपनी आहे. एसआयआय जगातील सर्वाधिक लस तयार करण्यासाठी ओळखला जातो. या कंपनीने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर भागीदारी करून ठेवली आहे. ही कंपनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने लस तयार करत आहे. ऑक्सफर्डचा प्रकल्प यशस्वी झाल्यास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लसीचे 100 कोटी डोस तयार करेल. त्यापैकी 50 टक्के भारतासाठी तर 50 टक्के गरीब व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना पाठविली जातील. ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस पूर्णपणे यशस्वी झाल्यास कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात भारताला मोठा फायदा होईल.