संपुर्ण जगाला प्रतिक्षा, Oxford च्या वैज्ञानिकाला ‘वॅक्सीन’ तयार होण्याबाबत निम्मीच खात्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डब्ल्यूएचओ, भारत आणि इतर देश ज्या लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि बऱ्याचं ठिकाणी उत्पादनाचे काम सुरू झाले आहे, आता त्यासंबंधित वैज्ञानिकांनी अपेक्षा अर्ध्या केल्या आहेत. माहितीनुसार ऑक्सफोर्डच्या कोरोना लसी विकास कार्यसंघाचे नेतृत्व करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी अ‍ॅड्रियन हिल यांनी लसीची चाचणी ५० टक्के यशस्वी होण्याची अपेक्षा केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या जेनर संस्थेचे संचालक अ‍ॅड्रियन हिल म्हणाले की, आगामी चाचणीत १०,००० स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येत आहे. परंतु याचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत आणि संसर्ग दर कमी होत आहे.

अ‍ॅड्रियन हिल म्हणाले की, हे नष्ट होणारे विषाणू आणि वेळेसोबत रेसिंग करण्यासारखे आहे. या क्षणी असे दिसते की, 50 टक्के भीती आहे की, कदाचित आपल्याला कोणतेही परिणाम मिळणार नाहीत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ChAdOx1 nCoV-19 नावाच्या लसीवर काम करत आहे. असा विश्वास आहे की इतर लसींच्या तुलनेत ही लस पुढे आहे. अ‍ॅड्रियन हिलच्या टीमने एप्रिलमध्येच मानवांवर प्राथमिक चाचण्या सुरू केल्या होत्या .

जगभरात इतक्या लवकर मानवी चाचण्या करणाऱ्या काही मोजक्याच लसी आहेत. जानेवारीत, या लसचे काम छोट्या लॅब प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आले होते, जेव्हा केवळ चीनमध्ये प्रकरणे नोंदली गेली होती. परंतु सुमारे 4 महिन्यांनंतर केवळ ब्रिटनच नाही तर जगाचेही लक्ष या लसीकडे आहे. या आठवड्यात अ‍ॅस्ट्रॅजेनेका नावाच्या औषधी कंपनीने अमेरिकेशी ऑक्सफोर्ड लसच्या 40 कोटी डोस उत्पादनासाठी अमेरिकेबरोबर 1.2 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. त्याचबरोबर ब्रिटीश सरकारने 10 कोटी डोस देण्याचे मान्य केले आहे. ब्रिटनमधील लोकांना आशा आहे की सप्टेंबरपर्यंत त्यांच्यासाठी 3 कोटी लस डोस तयार होतील.