Oxygen Crisis : आता गावांमध्ये सुद्धा भासणार नाही ऑक्सीजन टंचाई, PM केयर्स फंडातून 551 जिल्हा हॉस्पिटलमध्ये उभारले जातील प्लँट

नवी दिल्ली : देशात वेगाने कोरोना वाढत असताना ऑक्सीजनसाठी हाहाकार उडाला आहे. देशाची सध्याची स्थिती पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केयर फंडातून देशभरात 551 प्रेशर स्विंग अब्जॉर्प्शन (पीएसए) ऑक्सीजन संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान कार्यालयानुसार (पीएमओ), पीएम मोदी यांनी निर्देश दिले आहेत की, हे ऑक्सीजन प्लँट लवकरात लवकर सुरू झाले पाहिजेत. हे प्लँट जिल्हा स्तरावर ऑक्सिजनच्या उपलब्धतेला प्रामुख्याने प्रोत्साहन देतील. पीएमओनुसार, 551 ऑक्सीजन प्लँटसाठी निधी पीएम केयरमधून दिली जाईल.

पीएमओने आपल्या वक्तव्यात सांगितले की, हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने पीएम मोदी यांच्या निर्देशानुसार, पीएम-केयर निधीतून सार्वजनिक आरोग्य सुविधांतर्गत 551 समर्पित मेडिकल ऑक्सीजन जनरेशन प्लँटच्या स्थापनेसाठी निधी वाटपासाठी मंजूरी दिली आहे. कोरोना संकटा दरम्यान ऑक्सजीनच्या भीषण टंचाईला देश तोंड देत आहे.

पीएमओकडून माहिती देण्यात आली की, पीएम मोदी यांनी देशात पीएम केयर्स फंडातून 551 मेडिकल ऑक्सीजन बनवणार्‍या प्लँटला रविवारी मंजूरी दिली. हे ऑक्सीजन प्लँट विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हा मुख्यालयांतील सरकारी हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात येतील.

पीएमओने सांगितले की, ही खरेदी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून केली जाईल. हे प्लँट सार्वजनिक आरोग्य मजबूत करण्यासाठी उभारण्यात येत आहेत.