Oxygen | शरीरातील ऑक्सीजनची कमतरता पुर्ण करतात ‘हे’ पदार्थ, सध्याच्या काळात आवश्य करा सेवन; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – कोरोना (coronavirus ) संक्रमित लोकांच्या शरीरात ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता दिसते. अनेक रूग्णांमध्ये अचानक ऑक्सिजनची पातळी खाली येत आहे, जी धोकादायक असल्याचे सिद्ध होते. अशा परिस्थितीत काही पदार्थ सेवन करून ऑक्सिजन पातळी वाढविता येते.

अल्कधर्मी पदार्थ पातळी वाढवतात
आहार तज्ज्ञांच्या मते आरोग्य चांगले ठेवण्यात अँटी-ऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका निभावतात. एंटी-ऑक्सिडंट पदार्थ शरीरातील पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात, ज्यामुळे हृदय, कर्करोग यासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. ऑक्सिजनची पातळी देखील वाढवतात.

अल्कधर्मी पदार्थात अँटी -ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. शरीराचे पीएच मूल्य 7.4 आहे. ज्या खाद्यपदार्थाचे पीएच मूल्य 7 पेक्षा कमी असेल त्यांना आमलीक आणि 8 किंवा त्याहून अधिक असलेल्या पदार्थांना अल्कधर्मी म्हणतात. अ‍ॅव्होकाडो, केळी, गाजर, लसूण आणि खजूर अल्कधर्मी पदार्थ आहेत. नाशपाती, पपई, मनुका, लिंबू, टरबूज, आंबा, जर्दाळू इत्यादी फळांचे सेवन फायदेशीर आहेत.

 

फायबर समृद्ध अन्न पदार्थ


तंतुमय पदार्थ आपल्या शरीरासाठीही फायदेशीर असतात.
विशेषतः, फायबर-समृद्ध अन्न हे आमच्या पचन तंत्रासाठी उपयुक्त आहे.
अशा पदार्थांमध्ये अंकुरलेली डाळी-धान्ये, सफरचंद, जर्दाळू इत्यादींचा समावेश आहे.
फायबर बरोबर, अनेक आवश्यक एंजाइम देखील या पदार्थांमध्ये आढळतात,
जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
हे पदार्थ शरीरात होणारे हार्मोन्स देखील संतुलित करतात आणि ऑक्सिजनची पातळी देखील वाढतात.

रक्त परिसंचरण सुधारणारे अन्न
आपल्या शरीरातील ऑक्सिजन केवळ रक्ताद्वारे संपूर्ण शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचते.
अशा परिस्थितीत, जर शरीरात रक्त परिसंचरण चांगले असेल तर ऑक्सिजनची पातळी देखील सामान्य राहील.
बीटरूट, लसूण, हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, अंकुरित डाळी, धान्य, कोरडे फळे इत्यादी पदार्थ शरीरात रक्त परिसंचरण चांगले करतात. आहारात या पदार्थांचा समावेश करावा.

Web Title :- oxygen rich food coronavirus alkaline improve health blood circulation fiber

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

India Coronavirus Cases | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 41 हजार नवे रूग्ण; आतापर्यंत 37 कोटी 60 लाख लोकांना देण्यात आली व्हॅक्सीन

कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत