हे आहेत खरे हिरो ! 1180 KM न थांबता ड्रायव्हिंग करून पोहचवला ऑक्सीजन टँकर, दिली गेली VIP सुरक्षा

सागर : कोरोनाच्या या संकटात आपल्या समाजाला अशा हिरोंची आवश्यकता आहे, जे निस्वार्थ भावनेने मानवतेची सेवा करतील. खर्‍या जीवनातील असेच हिरो आहेत वीर सिंह. वीर सिंह यांनी 1180 किलोमीटरचा प्रवास 24 तासात आणि 25 टोल पार करत न थांबता पूर्ण केला. ड्रायव्हरने आपल्या या कामाने हजारो रूग्णांचे प्राण वाचवले आहेत. एमपीमध्ये सध्या ठिकठिकाणी ऑक्सीजनची कमतरता दिसत आहे. अशावेळी वीर सिंह यांच्या या कामाचे कौतूक करावे, तेवढे कमीच आहे.

राऊरकेला ते सागर न थांबता प्रवास
झी न्यूजशी बोलाताना वीर सिंहने सांगितले की, निर्देश होते की सागरमध्ये ऑक्सीजनची कमतरता होत आहे, यासाठी न थांबता लवकरात लवकर सागर येथे पोहचायचे आहे. याच कारणामुळे आम्ही ओडिशातील राऊरकेला ते सागरपर्यंतचे अंतर न थांबता पार केले.

या प्रवासादरम्यान, वीर सिंह आणि त्यांच्या हेल्परने जेवणसुद्धा केले नाही, आणि न थांबता 24 तास प्रवास सुरूच ठेवला. अखेर जेव्हा आज ऑक्सीजनचा टँकर पोहचला तेव्हा प्रशासनासह सर्व लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

टँकरला दिली गेली व्हीआयपी सुरक्षा
ऑक्सीजन टँकरचे सध्या किती महत्व आहे हे यावरून समजू शकते. म्हणूनच ऑक्सीजनच्या टँकरला मंत्र्याप्रमाणे व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली होती. या दरम्यान सशस्त्र दलांच्या गाड्या टँकरच्या अवती-भवती धावत होत्या. तसेच रस्ता मोकळा करून देत होत्या. ज्यामुळे टँकर सुरक्षित आणि वेळेत पोहचला.