‘OYO’ कंपनी ग्राहकांना एकदम ‘फ्री’मध्ये देणार १० लाखापर्यंतचे ‘विमा’ कवच, जाणून घ्या ‘प्रक्रिया’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता OYO या कंपनीने आपल्या ग्राहकांना विमा उपलब्ध करुन देण्याची तयारी केली आहे. ऑनलाइन बुकींग करणारी OYO या कंपनीने हॉटेल बुक करणाऱ्या ग्राहकांना विमा देण्याचा निर्णय घेतला आहे, बॅग हरवणे, अपघात होणे, हॉस्पिटलायजेशन यासारख्या बाबीवर इंश्युरन्स देण्याचा विचार केला आहे. OYO रुम्स ने यासाठी जनरल इंश्युरन्स कंपनी ACKO general Insurance बरोबर करार केला आहे.

लागणार नाही कोणतेही शुल्क
ओयो कंपनीकडून ग्राहकांना कॉम्प्लिमेंट्री वीमा कवर देण्यात येणार आहे. म्हणजे ग्राहकांना कंपनीकडून वीमा कवर देण्यात येणार आहे त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. ग्राहकांनी रुम बुक केल्यास ग्राहकाला त्या वीमा कवर मिळेल. ग्राहक आणि त्यांच्याबरोबर रुममध्ये थांबणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल.

हा मिळणार फायदा
ही ऑफर ओयो हॉटेल, ओयो होम, ओयो टाऊन शीप, कलेक्शन ओ, सिल्वर की, कॅपिटल ओ यासाठी उपलब्ध असेल. यासाठी ग्राहकाला बुकिंग अ‍ॅप oyo किंवा वेबसाइट किंवा थेट बुकिंग करावी लागेल.

१० लाख पर्यत मिळणार विमा
ओयोच्या विमा प्लॅन नुसार बॅग हरवल्यास ग्राहकाला १० हजार रुपये, विमा सुरक्षा तर अपघातात मृत्यू झाल्यास १० लाखाचा विमा देण्यात येणार आहे. तसेत अपघाताच्या मेडिकल खर्चावर २५ हजार रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळेल. याशिवाय कंपनी ओपीडी ट्रीटमेंटचा देखील खर्च उचलेलं.

असा करा क्लेम
१. ग्राहक OYO अ‍ॅप, वेबासाईट किंवा ACKO वर विमा सुरक्षा कवचासाठी क्लेम करु शकतात.

२. जर ओयोवरुन बुकिंग केले तर MY Booking टॅबवर जाऊन स्टे ड्यूरेशन निवडावे लागेल.

३. इंश्युरन्स पर्यायावर जाऊन स्टे नुसार इंश्युरन्स कवर क्लेम करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त