आगामी 6 महिन्यात ‘ही’ कंपनी देणार 3000 नोकऱ्या, 80 देशांत विस्तार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजघडीला जगभरातल्या तब्बल ८० देशांमध्ये आपला व्यवसाय अस्तित्वात असलेली ‘ओयो’ नावाची सुप्रसिद्ध कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. पुढील ६ महिन्यांत ही कंपनी ३००० लोकांना काम देणार आहे. या कंपनीचे हॉटेल आणि लोकांना निवास उपलब्ध करणे या क्षेत्रात कामकाज चालते. कंपनीच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून तसेच पुढच्या टप्प्यातील एक भाग म्हणून ३००० लोकांना हि कंपनी नियुक्त करणार आहे.

२०१९ च्या अखेरीस दक्षिण आशिया आणि भारतात १४०० कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक करण्याच्या प्रतिबद्धतेसह पुढे जात आहे असे ओयोने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीच्या विस्तार योजनांसह पुढे जाण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आपल्या ग्राहकांना उत्तम ग्राहक अनुभव प्रदान करणे आणि मालमत्ता मालकांना सातत्याने चांगला परतावा मिळवून देणे आमचे उद्दिष्ट आहे.

तसेच इतर विविध व्यावसायिक क्षेत्रात सुमारे ३००० कर्मचारी भरती करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये व्यवसाय विकास, ऑपरेशन्स, सेवा, विक्री आणि उद्योजक भागीदार यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

जगभरात कंपनीचे १७,००० कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी ९,००० पेक्षा जास्त कर्मचारी भारतात आहेत. ओयोचे असे म्हणणे आहे की, २०१९ च्या अखेरीस तिच्या दक्षिण आशिया आणि भारतीय व्यवसायात १४०० कोटी रुपये गुंतविण्याच्या प्रतिबद्धतेसह या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

ओयो हॉटेल आणि होम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) आदित्य घोष म्हणाले की, पुढील सहा महिन्यांत तीन हजार कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसह देशातील हॉटेल उद्योगात मूल्य वर्धित करण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच मालमत्ता मालकांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर आमचा भर असेल. तसेच अतिशय वाजवी दराने चांगली सेवा प्रदान करणे चालू ठेवू.

आजघडीला ओयोचे देशातील ३०० पेक्षा अधिक शहरांमध्ये जाळे पसरलेले आहे. सोबतच व्यवसायात दहा हजार हॉटेल मालक आमच्याशी जाेडलेले आहेत आणि त्यात दहा लाख रूम उपलब्ध आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –