पी. चिदंबरम यांच्या अटकेला पाकिस्तानातून विरोध, खा. रहमान मलिकने काश्मीर प्रश्नासाठी जोडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तानने चिदंबरम यांच्या अटकेला विरोध केला असून पाकिस्तानमधील खासदार रहमान मलिक यांनी या मुद्द्यावर बोलताना म्हटले कि, कलम ३७० रद्द करण्याला विरोध केल्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून नजर हटवण्याचा हा भारतीय सरकारचा प्रयत्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खुली सूट दिली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना त्यांनी शंका उपस्थित केली कि, विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी आणखी नेत्यांना अटक केली जाणार आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, ज्यावेळी चिदंबरम इस्लामाबादमध्ये सार्क संमेलनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला सावध करताना सांगितले होते कि, भारतात मोठ्या प्रमाणात कट्टरपंथीयांचा गट तयार केला जात आहे. त्यावेळी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही मात्र नंतर मला समजले कि, चिदंबरम खरे बोलत होते.

दरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करताना म्हटले कि, मोदी केवळ काश्मिरींना मारत नसून ते त्यांच्या विचारधारेला विरोध करणाऱ्या राजकारण्यांना देखील संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आणि मानवाधिकार संघटनांना काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचे देखील आवाहन केले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like