सुडाचे राजकारण ! अमित शहा – चिदंबरम यांच्यात 10 वर्ष ‘चेकमेट’चा ‘खेळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकारणात काहीही स्थायी नसते. राजकारणातील चक्रे खूप वेगाने फिरत असतात आणि सर्वकाही बदलून टाकत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा येत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच 3 दिवसांची मुदतवाढही फेटाळून लावली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज आणि तीन दिवसांची मुदतवाढ फेटाळून लावल्यानंतर आता ईडी आणि सीबीआय चिदंबरम यांच्याकडून अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. तेव्हा एजन्सीचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. मात्र आता काळही बदलला आहे आणि खेळही बदलला आहे.

2010 साली केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना चिदंबरम गृहमंत्री होते. त्यावेळी सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी सीबीआयनं अमित शहा यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. यासंदर्भातील चौकशीसाठी सबीआयानं दोनदा समन्स बजावूनही शाह उपस्थित न राहिले नव्हते. त्यावेळी अमित शहा यांच्या घरी सीबीआयने धाड टाकली होती. तेव्हा शाह त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्येही सापडले नव्हते. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे आता चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता तसाच जामीन शहा यांनाही नाकारण्यात आला होता. गांधीनगर इथल्या सीबीआय ऑफिसमध्ये शहा हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली होती.

ते तीन महिने तुरुंगात होते. तर त्यांना 2 वर्षे गुजरातबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले. 29 ऑक्टोबर 2010 ला रोजी गुजरात उच्च न्यायालयाने अमित शहा यांना जामीन मंजूर केला. अमित शहा यांच्या अटकेवर यूपीए सरकारवर सुडाने कारवाई केल्याचा आरोप केला होता. सीबीआयला हाताशी धरून काँग्रेस गुजरात सरकारचा आणि भाजप सरकारचा ‘पॉलिटिकल एन्काऊंटर’ करत असल्याचेही म्हंटले होते.

आता चिदंबरम यांच्यावीषयी काँग्रेस भाजपवर सुडाचे राजकरण करत असल्याचा आरोप करत आहे. सध्याच्या सरकारचे अपयश जनतेसमोर मांडत असल्यामुळे चिदंबरम यांना त्रास दिला जात आहे. असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त