‘या’ अटींवर पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळयाप्रकरणी चिदंबरम यांना अंमलबजावणी संचनालयानं (ईडी) अटक केली होती. तब्बल 106 दिवसांपासून ते तिहार तुरूंगात होते. 2 लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर आणि देश सोडून न जाण्याच्या अटींवर चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे.

चिदंबरम यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, यापुर्वी चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयात फेटाळण्यात आला होता. त्यावेळी मी काय रंगा-बिल्ला आहे काय अशी विचारणा चिदंबरम यांनी न्यायालयात केली होती. चिदंबरम यांच्या अटकेवरून दिल्लीतलं राजकारण प्रचंड तापलं होतं. तब्बल 106 दिवसांनंतर म्हणजेच साडे तीन महिने तुरूंगात राहिल्यानंतर चिदंबरम यांचा जामीन झाला आहे. आगामी काळात आयएनएक्स मीडिया प्रकरणाचं नेमकं काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Visit : policenama.com