अबब ! पी. चिदंबरम यांची वर्षाला 8.50 कोटींची ‘कमाई’, कुटूंबाकडे ‘एवढी’ संपत्ती की डोळे फिरतील, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – भारताचे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या कुटुंबीयांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता देशातच नव्हे तर परदेशातही आहे. चिदंबरम यांच्यावर परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे आयएनएक्स मीडियाला बेकायदेशीररित्या मंजुरी देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे.

आजकाल अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईत अडकलेल्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या कुटुंबीयांनी सुमारे १७५ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. तथापि, तपास करणार्‍या संस्था असा आरोप करत आहेत की, त्यांची वास्तविक मालमत्ता यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. तसेच पी. चिदंबरम यांच्यावर परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे आयएनएक्स मीडियाला बेकायदेशीररित्या मंजुरीसाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. ही घटना २००७ ची आहे, तेव्हा पी. चिदंबरम देशाच्या अर्थमंत्री पदावर कार्यरत होते.

माजी अर्थमंत्र्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे जवळपास ९५.६६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्या वरही सुमारे ५ कोटी रुपयांची देयता आहे. ते सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य आहेत. तथापि, त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेली ही संपत्ती चार वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचीच्या वेळेसची आहे. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनीही ८० कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. म्हणजेच चिदंबरम कुटुंबाने सुमारे १७५ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. सन २०१४-२०१५ मध्ये चिदंबरम यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न ५.५ कोटी आणि पत्नीचे उत्पन्न १.२२५ कोटी असल्याचे जाहीर केले होते.

इंग्लंड मध्ये एक घर, अन २० कोटीची ठेवी
चिदंबरम यांच्या मालमत्तेत सुमारे पाच लाखांची रोख रक्कम, बँका व अन्य संस्थांमध्ये २५ कोटी रुपये जमा, शेअर्स, डिबेंचर इ. मध्ये गुंतवणूकीची १३.४७ कोटी रुपये, पोस्ट ऑफिस योजनांमध्ये सुमारे ३५ लाख रुपये जमा, सुमारे १० लाख रुपयांच्या विमा पॉलिसी, २७ लाख रुपयांच्या माहागड्या कार, सुमारे ८५ लाख रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. त्यांची सर्वात मोठी ठेव २० कोटी रुपये आहे, तर किमान ठेव ३ हजार रुपये आहे.

याशिवाय त्यांच्या नावावर स्थिर मालमत्तांमध्ये सुमारे ७ कोटींची शेती जमीन, ४५ लाख रुपयांची व्यावसायिक इमारत, सुमारे ३२ कोटी रुपयांचे निवासी घर, इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच चिदंबरम यांच्याकडे तीन महागड्या कार आहेत. त्यामध्ये होंडा, टोयोटा इनोव्हा आणि स्कोडा या तीन कार चा समावेश आहे. चिदंबरम यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे होंडा आणि स्कोडाचे कोणते मॉडेल आहे हे स्पष्ट असे सांगितले नाही.

त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम तामिळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे सुमारे ८०० कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर सुमारे १६ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे सुमारे ३४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ज्यात ६ लाखांची रोकड, १६ लाख रुपयांची एफडी, सुमारे २५ लाख रुपयांची बँक ठेवी, १७ लाख रुपयांचे शेअर्स आणि बाँडस, एनएससी आणि १. ५ कोटी रुपयांचा विमा आणि ७७ लाख रुपयांचे दागिनेआहेत.

मुलाच्या नावावर परदेशात एकूण २५ मालमत्ता
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने ( सीबीआय ) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की पी. चिदंबरम आणि त्याचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याकडे परदेशात एकूण २५ मालमत्ता आहेत. कार्ती यांनी शेल कंपन्यांच्या नावे या सर्व मालमत्ता खरेदी केल्याचे सीबीआयचे वकील सांगतात. तथापि, चिदंबरम यांच्या वकिलांनी हे सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे.

स्पेनमध्ये टेनिस क्लब, यूकेमध्ये कॉटेज..!
चिदंबरम यांनी घोषित केलेल्या मालमत्तेच्या कित्येक अधिक पटीने त्यांची मालमत्ता असल्याचा आरोप तपास यंत्रणां करत आहे. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी बार्सिलोना, स्पेन येथे टेनिस क्लब आणि ब्रिटनमधील कॉटेज येथे सुमारे २३ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. या गुंतवणूकीसाठी पैसे कुठून आले याची चौकशी करण्याचा प्रयत्न तपास एजन्सी करीत आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात मिळालेल्या लाचखोरीतून ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. पी. चिदंबरम हेदेखील या प्रकरणातील आरोपी आहेत. एअरसेल-मॅक्सिस 2 जी घोटाळा प्रकरणात ते आपल्या मुलासह सह-आरोपी देखील आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने ५४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये भारत, ब्रिटन आणि स्पेनमध्ये पसरलेल्या मालमत्तेचा समावेश आहे.

तसेच तामिळनाडूमधील कोडैकनाल आणि ऊटी येथील शेती जमीन आणि बंगले. दक्षिण दिल्लीच्या जोरबाग येथे कार्ती आणि तिच्या आईच्या नावे १६ कोटींचा बंगला. आणि यू. के मध्ये ८.६७ कोटी रुपयांचे कॉटेज आणि घरे. स्पेनमधील बार्सिलोना येथे १४.५ कोटी रुपयांचा टेनिस क्लब. चेन्नईतील बँकेच्या शाखेत ९० लाख रुपयांची मुदत ठेव आहे.