हनुमानाची ‘छाती ५६ इंच’ होती का ; चिदंबरम यांचा नरेंद्र मोदी यांना टोला 

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निमित्त आता आरोप प्रत्यारोपांना बहर चढू लागला असून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी’ ५६ इंच छाती’ या मोदींच्या विधानावरून त्यांच्यावर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला असे वाटते कि भगवान हनुमानाची छाती तर ५६ इंच हाती का यावर माझा विश्वास बसत नाही.

असे म्हणत पी. चिदंबरम यांनी मोदींवर टीका केली आहे. चेन्नई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पी.चिदंबरम यांनी हे विधान केले आहे. पी.चिदंबरम यांनी मोदींवर जोरदार हल्ला करत रामायणातील एक उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. रामायणात एक प्रसंग आहे या प्रसांगात हनुमान आपली छाती हाताने चिरतो म्हणून मला वाटते कि हनुमानाची छाती हि ५६ इंच नसावी. या वर माझा विश्वास नाही कि हनुमानाची ‘छाती ५६ इंच’ होती असे चिदंबरम म्हणाले आहेत. हनुमानाच्या जातीचे रोज नवे संदर्भ सांगणाऱ्या भाजप नेत्यावर आणि ५६ छातीचे उदाहरण देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर चिदंबरम यांनी चांगलेच तोंड सुख घेतले आहे.

पी. चिदंबरम एवढेच म्हणून थांबले नाहीत तर त्यांनी नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणी वरून हि मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न  केला आहे.  नोटबंदीच्या विषयावरून मोदी सरकारचा विरोध करावा तेवढा कमीच आहे. परंतु फक्त काँग्रेसच नोटबंदीचा विरोध करते असे नाही तरअरविंद सुब्रमण्य यांनी हि नोटबंदीचा निर्णय योग्य नाही हे सत्य अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. एका हट्टी व्यक्तीमुळे या सर्व संकटांना देशाला सामोरे जावे लागले आहे. या सर्व चुका फक्त एकाच व्यक्तीने केल्या आहेत असे म्हणत पी.चिदंबरम यांनी मोदींचे नाव घेण्याचे टाळले आहे. हनुमानाची जात काढणाऱ्या भाजपला पी.चिदंबरम यांनी त्यांच्याहून हिन उदाहरण देऊन हनुमानाचा असा अपमान करणे कित्पद योग्य आहे असे समाजात विचारले जाऊ लागले आहे.

या आधी राज्यस्थान विधानसभेच्या निवडणुकी वेळी भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाची जात दलित असल्याचे म्हणून हनुमानाचा अपमान केला होता. त्यांच्यावर राजस्थान ब्राह्मण सभेने योगी यांच्यावर कायदेशीर नोटीस हि बजावली होती. त्यानंतर भाजपच्याच एका नेत्याने हनुमान आर्य असल्याचे म्हणले होते तर अन्य एका नेत्याने हनुमान मुस्लिम असल्याचे म्हणले होते. आधीच गुंता गुंतीचा ठरलेल्या विषयाला पी.चिदंबरम यांनी चिगळवण्याचा प्रयत्न केला आहे. पी.चिदंबरम यांच्या टीकेला भाजप काय उत्तर देणार हे आता पाहण्यासारखे राहणार आहे.