पी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची आज (शुक्रवार) तडकाफडकी बदली करण्यात आली. दीपक तावरे यांच्या जागी राज्य राखीव महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी. सिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना साथीवर नियंत्रण आणण्यात तावरे यांना अपयश आल्याने त्यांची तडकाफडकी बदली केल्याची बोलले जात आहे.
सोलापूरमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

यावर तावरे यांना नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. त्याचा फटका बसला असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत देखील नाराजी व्यक्त केली जात होती. सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. त्यामुळे जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापुरमध्ये येऊन विविध संघटनांची बैठक घेतली.

सायंकाळी त्यांची पत्रकार परिषद संपण्याच्या वेळी तावरे यांच्या बदलीचे आदेश जारी झाले. सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा झाले आहेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्या कामाबद्दल वरिष्ठ पातळीवरून नाराजी व्यक्त केली जात होती. पालकमंत्र्यांची आढवा बैठक झाल्यानंतर सायंकाळी महापालिका आयुक्त तावरे यांच्या बदलीचा आदेश नगरविकास खात्याकडून आला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like