बॅडमिंटन चॅम्पियन पी व्ही सिंधूनं केला डोक्यावर ‘मटकी’ ठेऊन मन’मोहक’ डान्स ! (व्हिडीओ)

हैद्राबाद : वृत्तसंस्था – बॅडमिंटन चॅम्पियन पी व्ही सिंधूनं नुकतीच हैद्राबादमधील एका उत्सवात हजेरी लावली होती. या उत्सवात पी व्ही सिंधू थिरकताना दिसली. इतर महिलांसोबत सिंधूनंही नृत्य करण्याचा मनसोक्त आनंद घेतला. तिनं डोक्यावर एक हांडी ठेवली यानंतर गाण्यावर डान्स करण्याचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी सिंधूच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हैद्राबादमधील या उत्सवाचे नाव बाथुकम्मा उस्तव असं आहे.

सिंधू डान्स करतानाही खूप उत्साही दिसत होती. सिंधूची स्माईल आणि तिने घातलेला घागरा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. डान्स करतानाही सिंधू सतत स्माईल करत होती. इतर महिलांसोबत सिंधूननेही डान्सचा भरभरून आनंद घेतला. या बाथुकम्मा उत्सवात केंद्रीय गृह राज्य मंत्री किशन रेड्डीदेखील सहभागी होते. या उत्सवात सिंधूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Visit : Policenama.com