दिलासादायक ! देशात मंदावला कोरोनाचा वेग, मागील 24 तासात आली 45 दिवसातील सर्वात कमी प्रकरणे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील कोरोना (corona)चा वेग हळुहळु कमजोर होऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात शनिवारी 1,73,790 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली. हा भारतात मागील 45 दिवसात आलेला सर्वात कमी आकडा आहे आणि या महिन्यात देशात तिसर्‍यांदा 200,000 पेक्षा कमी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या आजारामुळे किमान 3,617 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आजपर्यत एकुण 322,512 लोकांनी व्हायरसमुळे जीव गमावला आहे.

Pune : पुण्यात 500 रुपयांसाठी खून करणाऱ्याला जन्मठेप; जाणून घ्या खटला

 

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कोरोना व्हायरसच्या 1.73 लाख नव्या प्रकरणांसह देशात कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकरणांत घसरण सुरू आहे. मागील 45 दिवसात आज कोरोना व्हायरसची सर्वात कमी नवीन प्रकरणे आली आहेत. मागील 24 तासात 2,84,601 रुग्ण कोरोनामधून बरे झाले. मागील 24 तासात सक्रिय प्रकरणांमध्ये 1,14,428 ची घट होऊन सक्रिय केसलोड 22,28,724 पर्यंत पोहचला आहे.

Pune : व्याजाचे पैसे न दिल्याने आलिशान फॉर्च्युनर गाडी नेली चोरुन; अमित कलाटे याच्यावर आणखी एक FIR

 

मागील 24 तासादरम्यान 2,84,601 रूग्ण बरे होण्यासह, देशभरात आतापर्यंत एकूण 2,51,78,011 लोक बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट वाढून 90.80 टक्के झाला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर सध्या 9.84%, वरून घसरून 8.36% झाला आहे. लागोपाठ 5 दिवसात 10% पेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर येत आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) जारी आकड्यांनुसार, भारतात काल कोरोना व्हायरससाठी 20,80,048 सम्पल टेस्ट करण्यात आली, कालपर्यंत एकुण 34,11,19,909 सॅम्पल टेस्ट केली गेली आहेत.

Also Read This : 

Pune Crime News : प्रियकराने लग्न करण्यास केली टाळाटाळ; नैराश्यातून 23 वर्षीय पूर्णा चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगर परिसरातील घटना

 

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

 

Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

 

उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

 

केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !

 

फुफ्फुसाचा कर्करोगावर; मिरची गुणकारी असल्याचा संशोधकांचा दावा!

 

‘या’ 7 पध्दतीनं पसरू शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं संक्रमण, WHO म्हणालं – ‘सर्वजण सावधगिरी बाळगा’